Animal Husbandry

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी, मेंढपाळांचा मेंढी चराईचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे सांगितले. याबाबत ते म्हणाले, मेंढपाळांना पशुधनविमा योजना सुरू करण्यासोबतच या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक योजना राबविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे.

Updated on 24 April, 2022 4:51 PM IST

मेंढपाळांच्या अनेक मागण्यांसंदर्भात मंत्रालयात एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी, मेंढपाळांचा मेंढी चराईचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे सांगितले. याबाबत ते म्हणाले, मेंढपाळांना पशुधनविमा योजना सुरू करण्यासोबतच या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक योजना राबविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मेंढपाळांच्या प्रलंबित मागण्या पुढे येत आहेत. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये मेंढपाळ आणि वन विभागामध्ये संघर्ष होत आहे. नियमानुसार मेंढपाळांना वन क्षेत्रात मेंढ्याना चराई करण्याकरिता जाता येत नाही. शासनाकडून बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त मेंढी पालन व्यवसायाला प्रोत्साहन देणे, कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करणाऱ्या मेंढपाळांना शेडचे बांधकाम, बहुवार्षिक गवत प्रजातीचे बियाणे उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनांचे प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन यावेळी भरणे यांनी केले आहे.

तसेच आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी १०० कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच फिरते पशु चिकीत्साल यांची देखील संख्या वाढविण्यात येणार आहे. फिरत्या पशु चिकीत्सालयाकरिता १९६२ हा टोल फ्री क्रमांक आहे, त्याचा लाभ मेंढपाळांनी घ्यावा, असेही भरणे यांनी सांगितले.

तसेच मेंढपाळाना देण्यात येणाऱ्या पशुधनविमा योजनांचे कार्यक्षेत्र वाढविण्याबाबत बैठक घेवून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीला नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक कल्याणकुमार, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासचे सहसचिव माणिक गुट्टे, अवर सचिव विकास कदम, उपायुक्त डॉ.शैलेशे पेठे, विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंच अमरावतीचे संस्थापक संतोष महात्मे, जानराव कोकरे, उपस्थित होते. यामुळे आता याचा अनेकांना फायदा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
क्षणात झाले होण्याचे नव्हते, कोकणातील शेतकरी मोठ्या संकटात
शेतकऱ्यांनो 'या' म्हशीच्या जातींचे करा संगोपन, होईल बक्कळ फायदा..
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सांगितले महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे खरे कारण, म्हणाले शरद पवार..

English Summary: Now the livestock insurance scheme will start soon, many will benefit
Published on: 24 April 2022, 04:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)