चॉकलेट! नाव ऐकताच आपल्या तोंडाला पाणी सुटलं असेल बरोबर ना! पण जास्त चॉकलेट खाण्याने आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आपण जसे चॉकलेट खातो तशीच चॉकलेट आता पशुना देखील खाता येणार आहे पण चिंता करू नका ह्या चॉकलेट पशुसाठी चांगल्या असणार आहेत आणि ह्यामुळे त्यांना पोषकतत्वे भेटणार आहेत तसेच दुध देणाऱ्या पशुचे दुध देण्याची क्षमता वाढणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल नेमकी ही पशुची चॉकलेटचा माजरा आहे तरी काय? मित्रांनो हा पूर्ण वृत्तांत असा की, मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर येथे स्थित, नानाजी देशमुख पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठाच्या तज्ञांनी एक विशेष प्रकारचे कँडी चॉकलेट तयार केले आहे जे विशेषतः गायी आणि म्हशींसाठी खूप उपयुक्त ठरणार असल्याचा दावा वैज्ञानीकांनी केला आहे.
. हे चॉकलेट पशुना खाण्यासाठी खुप स्वादिष्ट लागेल, तसेच ह्या चॉकलेट पशुना सर्व पोषक तत्त्वे देखील प्रदान करतील त्यामुळे पशुची तबेत सुधरेल आणि दुधाळ पशुना ह्याचा विशेष फायदा होणार आहे आणि त्यांची दुध उत्पादन क्षमता वाढणार आहे.
जाणुन घ्या 'ह्या' पशुच्या विशेष चॉकलेट विषयी
चॉकलेट लहान मुलांचा खाऊ अहो लहान सोडा मोठी माणसे देखील चॉकलेटचा मोह आवरू शकत नाही, आणि आता ह्या यादीत गाई आणि म्हशीचा तसेच इतर पशुही सामील होणार आहेत. आता वैज्ञानीकांनी पशुसाठी विशेष चॉकलेट तयार केली आहे, ही जी चॉकलेट आहे त्यामुळे पशुना काही त्रास होणार नाही शिवाय जनावरांना ह्यामुळे पोषकतत्वे मिळणार आहेत आणि त्यांची तबेत सुधारणार आहे.
. नानाजी देशमुख पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठाच्या तज्ञांनी हे जे चॉकलेट तयार केले आहे त्याचे नाव "नर्मदा व्हिटॅमिन लिक" असे आहे. उन्हाळ्यात किंवा जेव्हा पशुना मुबलक चारा उपलब्ध नसतो तेव्हा त्यांना चांगली पोषकतत्वे मिळत नाहीत तेव्हा ह्या चॉकलेट खुप उपयोगाची पडणार आहे. ह्या चॉकलेटमध्ये आयोडीन, गूळ यासह अनेक आवश्यक गोष्टी टाकल्या गेल्या आहेत, ज्यामुळे ही चॉकलेट जनावरांना खाण्यासाठी गोड लागेल आणि पशु त्यामुळे ही चॉकलेट आवडीने खातील. पशु ही चॉकलेट चाटून खाऊ शकतील आणि एक कँडी सुमारे तीन ते चार दिवस पर्यंत पुरेल.
पोषकतत्वाने भरपूर आहे ही चॉकलेट
ह्या तयार केल्या गेलेल्या चॉकलेटला वैज्ञानिक भाषेत कॅटल चॉकलेट असे म्हटले जात आहे. तसेच असे सांगितले जात आहे की ही कॅटल चॉकलेट लवकरच जनावरांना उपलब्ध होणार आहे आणि लवकरच ती बाजारात उपलब्ध होईल अशी अशा व्यक्त केली जात आहे. ही तयार केली गेलेली चॉकलेट पोषक तत्वानी भरपूर आहे आणि ह्यामुळे पशुना आहारात चांगले पोषकतत्वे मिळतील त्यामुळे दुध उत्पादन वाढेल.
Published on: 12 October 2021, 03:02 IST