सध्या राज्यासह देशातील शेतकरी लम्पी रोगामुळे त्रस्त आहेत. यामध्ये अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत होते. या संकटसमयी राज्य सरकारनं शेतकर्यांना दिलासा देत, लम्पी आजारामुळे दगावलेल्या जनावरांच्या मालकाला आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
यामध्ये दुधाळ गायीचा मृत्यू झालेला असल्यास मालकाला ३० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. लम्पी आजारामुळे बैलाचा मृत्यू झाल्यास २५ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे. तर वासराचा मृत्यू झाल्या १६ हजार रुपयांची मदत संबंधित मालकाला मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारकडून कडून मदतीचा शासन आदेश जारी करण्यात आलाय. ४ ऑगस्टपासून ज्यांची जनावरं लम्पी आजारामुळे मृत्युमुखी पडली आहेत, त्यांना सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता नवीन सुरुवात करण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील निकषांप्रमाणे ही मदत जाहीर करण्यात आली आहे.
पावसात जनावरे दगावली तर मिळणार मदत, शेती पाण्याखाली शेती गेली की मिळणार तत्काळ मदत..
यामध्ये अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक हे निकष शिथील करून राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषांप्रमाणे सर्वांना अर्थसहाय्य मिळावं, या अनुषंगाने राज्य सरकारने मदतीची घोषणा केली आहे. मृत पशुधनाच्या संख्येवरील निर्बंधांचे निकष सुद्धा ही मदत देताना शिथील करण्यात येणार आहेत. यामुळे आता याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
आता जमीन खरेदीसाठी सरकार देणार 100 टक्के अनुदान, जाणून घ्या सविस्तर..
दरम्यान, महाराष्ट्रात लम्पी आजारामुळे जनावरं आजारी पडून दगावत आहेत. आधीच शेतकर्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे खरिप हंगामातून हाती फारसे काही येणार नाही. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे मदतीची मागणी शेतकरी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
पावसामुळे टोमॅटोची आवक घटली, दरात 10 ते 15 रुपयांची वाढ, शेतकऱ्यांना दिलासा...
16 व्या पॅन-आशिया शेतकरी प्रोग्राममध्ये बायोटेक कॉर्न उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद, आधुनिक शेतीचा होतोय फायदा..
आज स्वाभिमानीची ऊस परिषद, राजू शेट्टी काय घोषणा करणार? ऊस उत्पादकांचे लागले लक्ष
Published on: 15 October 2022, 03:22 IST