भारत हा एक कृषिप्रधान देश आहे त्यामुळे देशातील 80 ते 90 टक्के लोकसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेतीबरोबरच येथील शेतकरी पशुपालन व्यवसाय सुद्धा करतात. शेती साठी उपयुक्त असा जोडव्यवसाय हा पशुपालन आहे शिवाय या जोडव्यवसायातून बक्कळ पैसे सुद्धा मिळतात या मध्ये दुग्ध्यवसाय, शेळी पालन यांचा समावेश होता.
जनावरांचे योग्य व्यवस्थापन गरजेचे:-
पशुपालन व्यवसाय शेतकरी वर्गाला असंख्य अडचणी येत असतात त्यामधे जनावरांमध्ये पसरणारे साथीचे आजार, लसीकरण हे आहेच परंतु जनावरांची काळजी राखणे आणि निगा ठेवणे खूप गरजेचे आहे. या मधे जनावरांचे योग्य व्यवस्थापन खूप गरजेचे आहे. गोठ्या मधे नियमित मोकळी हवा ठेवावी. याची काळजी घ्यावी. जनावरांची योग्य रित्या काळजी घेतली तर जनावरे आजारी पडत नाही जनावरांना नेहमी पुरेपूर चारा आणि पिण्यायोग्य पाणी द्यावे. शिवाय गुरांचा गोठा नियमितणे साफ करावा.
हेही वाचा:- राज्यात या जिल्ह्यात मिळतोय नवीन कापसाला 16 हजार रुपये भाव, वाचा सविस्तर
बऱ्याच वेळा आपण पाळलेल्या गाई आणि म्हैशी गाभण राहण्यास खूप त्रास देतात. अनेकदा लागण करून सुद्धा जनावरे वारंवार उलटतात. गाई आणि म्हैशी मध्ये माजाचे चक्र हे 21 दिवसांनी येत असते. ज्या गाई किंवा म्हैशी चे दूध देण्याचे प्रमाण जास्त असते अश्या गाई आणि म्हैशी मध्ये उलटण्याचे प्रमाण अधिक असते. गाई आणि म्हैस उलटण्याची अनेक कारणे आहेत त्यामधील 2 म्हणजे फलनातील दोष आणि भ्रूण दोष ही प्रमुख कारणे आहेत. लागण केल्यानंतर फलनाची क्रिया योग्य झालेली असल्यास, २१ दिवसांनी गाई किंवा म्हैशी पुन्हा माज करत नाहीत.
नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने जनावर गाभण न राहण्याच्या समस्येवर नैसर्गिक घरगुती उपचार पद्धती:-
हे सांगितलेलं उपचार जनावरांनी माज केल्यानंतर 2 ते 2 दिवसात करणे गरजेचे असते. नंतर केल्यास त्याचा काहीही फायदा होत नाही.
1) माज केल्यानंतर जनावरांना पाच दिवस एक मुळा चारावा.
2) माज केल्यावर पाहिले चार दिवस जनावरांना कोरफडीचे एक पान दररोज चारावे.
3) माजानंतर चार दिवस चार मुळी हडजोड करावी
4) जनावरांनी माज केल्यापासून पुढील चार दिवस चार मुठी कडीपत्ता व हळद चारावी.
Published on: 04 September 2022, 12:02 IST