Animal Husbandry

भारतात मोठ्य़ा प्रमाणात दुधाचे उत्पादन घेतले जाते. दुधाळ प्राण्यांचे संगोपन करुन अनेक शेतकरी शेतीव्यवसायासह दुधाचा व्यवसाय करत असतात. पण दुधाच्या दोन प्रकाराविषयी आपणांस माहिती आहे का? याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. हे प्रकार आहेत ए-१ आणि ए- २.

Updated on 07 May, 2020 2:19 PM IST


भारतात मोठ्य़ा प्रमाणात दुधाचे उत्पादन घेतले जाते. दुधाळ प्राण्यांचे संगोपन करुन अनेक शेतकरी शेतीव्यवसायासह दुधाचा व्यवसाय करत असतात. पण दुधाच्या दोन प्रकाराविषयी आपणांस माहिती आहे का? याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. हे प्रकार आहेत ए-१ आणि ए- २. या दोन्ही प्रकरामधील कोणते दूध आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे. कोणत्या दुधामुळे तोटे होतात याचीच माहिती घेऊ....

ए- १ आणि ए-२ दुधामधील फरक काय

परदेशी संकरित जातीच्या (आयरशायर, जर्सी ) पासून मिळणाऱ्या दुधाला वैज्ञानिक भाषेत १ दुध म्हणतात. भारतात उत्पादित होणाऱ्या दुधाच्या एकूण मात्रेत ९५ टक्के ए -१ दूध आहे. जर भारतातील मुळ जातीच्या गायी साहिवाल, गीर, थारपारकर, लाल सिंधी, हरियाणवी इत्यादी पासून मिळणाऱ्या दुधाला ए-२ प्रकारचं दूध म्हटले जाते.

ए-१ दूधाची भीती -

भारतात वाढलेले दूध उत्पादन हे संकरित जातींमुळे वाढले आहे. परंतु त्यामुळे काही समज आणि गैरसमज समाजात पसरली आहेत. याविषयी आपण थोडी माहिती घेऊ. संकरित जातीपासून उत्पादित झालेले दूध हे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक आहे का ? दरम्यान आंतरराष्ट्रीय दुध बाजारात ए १ दुधाच्या गुणवत्तेवरून चिंता व्यक्त करण्यात आली. अमेरिकेत करण्यात आलेल्या संशोधनात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ए १ मध्ये मिळणाऱ्या बीसीएम ७ हे तत्व माणसाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. आपल्या शरिरात अनेक प्ररकारच्या व्याधी निर्माण करु शकतात. तर डेनमार्क, स्वीडनच्या संशोधनानुसार बीसीएम ७ मुळे डायबिटीज किंवा हृद्यरोग होण्याची शक्यता आहे. यासह ए१ दूध पचण्यास त्रासदायक असते. यामुळे अनेकांना दुग्धशर्करा असहिष्णुता सारख्या समस्या उत्पन्न होतात.

ए-२ दूध गुणवत्ता -  देशी जनावरांपासून मिळालेल्या दुधात गुणवत्ता अधिक असते. देशी जातीच्या जनावरांपासून उत्पादित दुधात अमिनो अम्ल प्रोलीन मिळत असते. हे बीसीएम ७ला शरीरात आत्मसात करण्यास परवानगी देत ​​नाही. ज्यामुळे ए -२दूध पचविणे सोपे आहे. या दुधामुळे कोणताच दुष्परिणाम होत नाही.  ए-२ दूधाच्या या गुणांमुळे विशेषज्ञ बाल कुपोषण सारख्या समस्या दूर करण्यासाठी याचे सेवन करण्याचा सल्ला देत असतात.

ए -२ दुधाच्या मागणीत वाढ - आपल्या औषधी गुणांमुळे न्युझीलँड आणि अमेरिकेत ए-२ दूध जगभऱात लोकप्रिय आहे. तर भारतात अमूल सारख्या कंपन्यांनी याचे उत्पादन सुरू केले आहे.  बाजारभावातही ए-२ चे दर अधिक आहेत. ए-२ दूध ९० रुपये प्रति लिटर आहे. तर ए-१ दुधाची किंमत ही प्रति लिटर ४० ते ५० रुपये आहे.

English Summary: n2 milk is useful to health ; know the difference between n 1 and n2 6
Published on: 07 May 2020, 02:13 IST