Animal Husbandry

मटन व्यवसायाचं सोनंयुग सुरू झालंय! आज शहरी भागात वाढणाऱ्या हॉटेल्स, रिसॉर्ट्स, ढाब्यांमुळे मटनाची मागणी अभूतपूर्व वेगाने वाढते आहे. केवळ शहरी भागच नाही तर ग्रामीण भागातही सण-समारंभ, कार्यक्रम, केटरिंग व्यवसायांमुळे मटन खपात दरवर्षी २०-३०% वाढ होते आहे.

Updated on 17 July, 2025 5:20 PM IST

मटन व्यवसायाचं सोनंयुग सुरू झालंय!'

आज शहरी भागात वाढणाऱ्या हॉटेल्स, रिसॉर्ट्स, ढाब्यांमुळे मटनाची मागणी अभूतपूर्व वेगाने वाढते आहे. केवळ शहरी भागच नाही तर ग्रामीण भागातही सण-समारंभ, कार्यक्रम, केटरिंग व्यवसायांमुळे मटन खपात दरवर्षी २०-३०% वाढ होते आहे.

भारताचा मटन बाजार (Market Size):

सध्या भारतीय मटन मार्केटचे वार्षिक मूल्य सुमारे १.६ लाख कोटी रुपये आहे.

२०३० पर्यंत हा बाजार २.५ लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू हे राज्ये मटन पुरवठ्यात आघाडीवर.

शेळीपालन व्यवसाय का करावा?

कमी जागा, जास्त नफा: १ एकर जागेत ५० शेळ्या सहज वाढवता येतात.

मार्केट रेडी प्रॉडक्ट: ८-१० महिन्यांत शेळी विक्रीस तयार होते.

हॉटेल्स व केटरिंग कडून थेट मागणी: मध्यम व मोठ्या शहरांच्या आजूबाजूला शेळीपालन करणाऱ्यांना नियमित मागणी.

निर्यात संधी: मटन आणि शेळ्यांची निर्यात UAE, सौदी अरेबिया, कुवेत या देशांत वाढते आहे.

सेंद्रिय शेतीसाठी शेळी खताचा उपयोग: शेळीच्या शेणातून उत्तम दर्जाचं खत मिळतं.

भविष्यातील संधी:

भारतातील मटनाचा ९०% खप अजूनही असंघटित बाजारातून होतो. जर शेतकरी गट, SHG किंवा लघुउद्योगांनी संगठित उत्पादन व पुरवठा केला तर संपूर्ण मार्केट कॅप्चर करता येईल.

शेळीपालनातून एक मोठी शेळी दरवर्षी सरासरी ३-४ पिल्ले देते, ज्यातून उत्पन्नात झपाट्याने वाढ होते.

थोडी गुंतवणूक, मोठा नफा:

१० शेळ्यांपासून व्यवसाय सुरू केल्यास १२ महिन्यांत सरासरी ₹१.५- २ लाख नफा मिळू शकतो.

५० शेळ्यांपासून सुरूवात केली तर हा नफा ₹८-१० लाखांपर्यंत जाऊ शकतो.

“शेळीपालन म्हणजे भविष्याचं सोनं आहे; शाश्वत उत्पन्न देणारं साधन आहे.”

आजच शेळीपालन सुरू करा, येत्या ५ वर्षांत स्वतःचा मटन ब्रँड उभा करा!

लेखक- नितीन रा. पिसाळ

पशुसंवर्धन सल्लागार व कृषी अभ्यासक

फार्मर द जर्नलिस्ट- कृषी जागरण (राष्ट्रीय कृषी मीडिया)

English Summary: Mutton business is booming due to hotel business; demand for mutton will skyrocket in the future!
Published on: 17 July 2025, 05:20 IST