मुऱ्हा म्हैस ही पशुपालनात आपले एक वेगळेच स्थान ठेवते. भारत हा श्वेत क्रांतीत नक्कीच अग्रेसर होत आहे, आणि ह्यात आपल्या देशात असलेल्या पशुधनाचा खुप मोठा वाटा आहे. आणि अशातच एक अच्छी खबर म्हणजे आपल्या देशातील हरियाणा प्रांतातील मुऱ्हा जातीच्या पालनात आपला शेजारी देश श्रीलंकेने इच्छा जाहीर केली. एवढेच नाही तर, पशुपालन क्षेत्रात परस्पर विकासाची व्यापक शक्यता लक्षात घेता, श्रीलंका आणि हरियाणातील शिष्टमंडळे देखील एकमेकांना भेट देतील, मुर्रा जातीची म्हैस दुध उत्पादनात एक अग्रेसर म्हैस आहे.
या विषयावर, 13 सप्टेंबर हरियाणा भवन, नवी दिल्ली येथे, श्रीलंकेचे ग्रामविकास राज्यमंत्री सथाशिवम विलेंद्रन आणि श्रीलंकेच्या पंतप्रधानांचे समन्वय सचिव, सेंथिल थोंडमन यांनी हरियाणा राज्याचे कृषी मंत्री जय प्रकाश दलाल यांच्यासोबत मीटिंग घेतली आणि चर्चा केली. मिटींगमध्ये, हरियाणा आणि श्रीलंका दरम्यान कृषी क्षेत्र, विशेषत: पशुपालन आणि कृषी तंत्राची देवाणघेवाण होण्याची शक्यता लक्षात घेता सखोल चर्चा झाली.
माननीय मंत्री महोदय यांनी ह्या विषयावर दिली श्रीलंकेला माहिती
बैठकीदरम्यान, जय प्रकाश दलाल यांनी राज्याचे कृषी क्षेत्र, कृषी संशोधन, कृषी तंत्र, ई-मंडी, कृषी विपणन, फलोत्पादन केंद्र उत्कृष्टता, पशुपालन, विशेषतः सर्वाधिक दुधाची संभाव्य मुर्रा म्हैस, दुधाची संयत्रे आणि इतर संबंधित विषयांवर श्रीलंकेचे मागास ग्रामीण विकास राज्यमंत्र्यांना माहिती दिली.
काय बोल्लेत श्रीलंकेचे राज्यमंत्री
श्रीलंकेचे राज्यमंत्री सथाशिवम विलेंद्रन म्हणाले की ते हरियाणाच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्राच्या विकासामुळे खूप प्रभावित झाले आहेत. श्रीलंकेला हरियाणाच्या पशुसंवर्धनामध्ये विशेष रस आहे, विशेषतः उच्च दुधाच्या क्षमतेच्या मुर्रा जातीच्या म्हशींच्या संगोपनात आणि श्रीलंका आणि हरियाणा यांच्यात कृषी आणि पशुपालन क्षेत्रात परस्पर विकासाची प्रचंड क्षमता आहे.
नेमकी काय आहे मुऱ्हा म्हशीची विशेषता
मुर्रा म्हैस ही भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या म्हशीची जात आहे. या जातीच्या म्हशी दररोज जवळपास 15 ते 20 लिटर दूध देतात. यामध्ये बहुतेक म्हशी तर 30-35 लिटर पर्यंत दूध देतात. ह्या जातीच्या म्हशीतील दुधातील फॅट 7 टक्क्यांपेक्षा जास्त असतो. यामुळे, पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची ही पहिली पसंत बनली आहे. जर आपण त्यांच्या किंमतीबद्दल विचार केला तर ह्या म्हशीची किमंत ही साधारणतः 1 लाखापेक्षा जास्त असते. म्हशीच्या दुध देण्याच्या क्षमतेनुसार, काही म्हशीची किंमत पार 4 लाख रुपयांपर्यंत पोहोचते.
Published on: 16 September 2021, 09:03 IST