भारता हा कृषिप्रधान देश आहे. भारताची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. कृषी क्षेत्राबरोबरच भारतामध्ये पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वेगाने वाढत आहे. भारतामध्ये बरेच शेतकरी हे शेती सोबत पशुपालन हा जोडव्यवसाय करतात.
परंतु पशुपालन व्यवसायाला आता मोठ्या प्रमाणात व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. पशुपालना मध्ये प्रामुख्याने दुग्धोत्पादनासाठी गाय आणि म्हशी पाळल्या जातात. परंतु गाईंची किंवा म्हशीचीदूध देण्याची क्षमता ही जातीपरत्वे वेगळी आहे. या लेखात आपण म्हशीचा मुऱ्हाया जाती बद्दल जाणून घेणार आहोत.
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे मुऱ्हा म्हैस
मुरा म्हैस ही प्रामुख्याने पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे जास्त प्रमाणात आढळते.
कारण बरेच पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरीमुरा म्हशीचे पालन करतात.म्हशीच्या इतर जातींच्या तुलनेमध्ये मुरा जातीच्या म्हशी जास्त दूध देतात. या जातीच्या म्हशी ची किंमत ही जास्त असते. कारण या म्हशी जास्त दूध देण्याची क्षमता ठेवतात.
या म्हशीमध्ये असतो जास्त दूध देण्याचा गुणधर्म
मुरा मैस ज्या शेतकऱ्यांकडे असते त्यांचे आर्थिक कमी चांगले असते. या जातीच्या म्हशी जास्त दूध देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या जातीच्या म्हशी इतर जातीच्या म्हशी पेक्षा अधिक दूध देतात. या जातीच्या म्हैस साधारणपणे 15 ते 20 लिटर दूध देते. तर काही म्हशी 30 ते 35 लिटर देखील दूध देतात.
मुऱ्हा जातीच्या म्हशीच्या दुधाला सात किंवा त्यापेक्षा जास्त फॅट लागतो. पुढे बरेच पशुपालन करणारे शेतकरी मुरा जातीची म्हैस पाळण्यास पसंती देतात. या जातीच्या म्हशी कोणत्याही प्रकारच्या वातावरणात तग धरू शकतात. या जातीच्या म्हशीची शिंगे वळलेली असतात व या म्हशी पंजाब आणि हरियाणा राज्यासह देशातील इतर भागात आढळतात. हरियाणा राज्यात मुऱ्हा जातीच्या म्हशी ला काळ सोन म्हटले जाते. या जातीच्या म्हशी ची किंमत एक लाखांपासून ते तीन ते चार लाखांपर्यंत आहे.
Published on: 14 December 2021, 01:34 IST