Animal Husbandry

दूध व्यवसाय करीत असताना वर्षभर दुभत्या गाईंना पौष्टिकआहार पुरविणे गरजेचे असते. आपल्या देशात मागील काही वर्षांपासून पावसाच्या अनिश्चित प्रमाणामुळे चाराटंचाई निर्माण झाली आहे या दुष्काळी परिस्थितीत चारा छावण्यांची उभारण्यात करण्यात आली. परंतु अशाप्रकारच्या छावण्या हा काही कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. त्यासाठी हिरवा चारा वर्षभर साठविण्याचे नियोजन म्हणजेच मुरघास निर्मिती होय. लेखात जाणून घेऊ की मुरघास निर्मिती कशी करतात?

Updated on 07 July, 2021 12:42 PM IST

 दूध व्यवसाय करीत असताना वर्षभर दुभत्या गाईंना पौष्टिकआहार पुरविणे गरजेचे असते. आपल्या देशात मागील काही वर्षांपासून पावसाच्या अनिश्चित प्रमाणामुळे चाराटंचाई निर्माण झाली आहे या दुष्काळी परिस्थितीत चारा छावण्यांची उभारण्यात करण्यात आली. परंतु अशाप्रकारच्या छावण्या हा काही कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. त्यासाठी हिरवा चारा वर्षभर साठविण्याचे नियोजन म्हणजेच मुरघास निर्मिती होय. लेखात जाणून घेऊ की मुरघास निर्मिती कशी करतात?

 मुरघास निर्मिती

 मुरघास निर्मिती साठी मका व ज्वारी सारखी चारा पिके 75 ते 80 दिवसांत कापणीला येतात. चारा पिके त्यांच्या चिकाच्या किंवा फुलोऱ्याची अवस्था झाली की कापावीत. मुरघास बनवताना चारा पिकातील पाण्याचे प्रमाण  60 ते 65 टक्के असावे. त्यापेक्षा जास्त पाणी झाल्यास नुकसान होऊ नये म्हणून पीक कापणी नंतर थोडावेळ साठी चारा सुखू द्यावा.

 त्यानंतर कुट्टी मशीन च्या साह्याने चार याचे 1 -2 इंच लांबीचे तुकडे करावेत. कुट्टी केल्यानंतर शक्यतो ती एका जागेवर साठवून न ठेवतात त्वरित बॅगेत, खड्ड्यात तेव्हा बांधकाम केलेल्या जागी आणून टाकावी. कुट्टी  टाकल्यानंतर ती पसरवावी.

 धुमशाने किंवा पायाने अथवा ट्रॅक्टरने तुडवावी. यामुळे त्यातील हवा बाहेर निघून जाते व कुट्टी दाबून बसते. कडावरची कुटी विशेषता चांगली दाबून घ्यावी. एकावर एक चाऱ्याचा थर टाकून व्यवस्थित दाबून शेवटचा तर देखील चांगला दाबून घ्यावा. त्यावर त्वरित प्लॅस्टिकचे आच्छादन घालावे त्यामुळे हिरवा चारा हवा बंद होतो. त्यानंतर प्लास्टिक आच्छादनावर सहा इंच जाडीचा मातीचा थर द्यावा. त्यावर पावसाचे पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

 एक चौरस फूट जागेत 15 ते 16 किलो चारा तयार होतो. म्हणून त्यानुसार गरज ओळखून खड्डे किंवा बांधकाम केले जावे. मुरघास बनवतांना प्रत्येक थरावर काही जिवाणू असलेले द्रावण, मीठ फवारले जाते. त्यामुळे हिरवा चारा टिकून राहतो मुरघास लवकर तयार होतो व बुरशी लागत नाही. बहुतेक वेळा या सर्व गोष्टींची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे मुरघास तयार करताना अपयश येते.

त्यामुळे पहिल्यावेळी मुरघास बनविताना त्यात काहीही टाकू नये. प्रायोगिक तत्त्वावर मुरघास करून पहावा. शिकून घ्यावे शक्य असल्यास जिवाणूंची द्रावण फवारावे. त्यामुळे चारा खराब होण्याची शक्यता कमी होते. पहिल्याच प्रयत्नात चांगला मुरघास तयार होतो. आपण चारा हवा बंद केल्यानंतर त्यामध्ये राहिलेल्या हवेतील प्राणवायूचे श्वसन हिरव्या चाऱ्यामुळे होते. हवा बंद झाल्याने बुरशी लागत नाही. बुरशीला प्राणवायू मिळत नाही व जिवाणू मार्फत लॅक्टिक  ॲसिडची निर्मिती झाल्यामुळे सारा टिकून राहतो. हिरवा चारा व्यवस्थित हवाबंद करून साठवून ठेवल्याने फायदाच फायदा आहे.

 

English Summary: murghaas nirmiti
Published on: 07 July 2021, 12:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)