Animal Husbandry

पशुपालन तसेच दूध व्यवसाय असेल तर त्यासाठी हिरवा चारा मोठा प्रमाणात लागतो जे की या व्यवसायात जनावरांच्या चाऱ्यावर 60-65टक्के खर्च जातो. पावसाळा तसेच हिवाळा मध्ये चाऱ्याची लागवड केली की हिरवा चारा मोठ्या प्रमाणात साठवता येतो.

Updated on 01 February, 2022 10:32 AM IST

पशुपालन तसेच दूध व्यवसाय असेल तर त्यासाठी हिरवा चारा मोठा प्रमाणात लागतो जे की या व्यवसायात जनावरांच्या चाऱ्यावर 60-65 टक्के खर्च जातो. पावसाळा तसेच हिवाळा मध्ये चाऱ्याची लागवड केली की हिरवा चारा मोठ्या प्रमाणात साठवता येतो.

परंतु आजही काही शेतकऱ्यांना याबद्दल माहिती नाही.12 महिने जनावरांना हिरवा चारा देणे शक्य नसते त्यामुळे चारा साठवणे गरजेचे असते आणि त्यात दूध व्यवसाय असेल आणि नियमितदुधामध्ये घट न होता दूध पाहिजे असेल तर हिरव्या चाऱ्याची आवश्यकता असते आणि यासाठी साधा उपाय म्हणजे मुरघास तयार करणे.

 मुरघास कशाला म्हणतात

हिरवा चारा योग्य त्या वेळी कापणे आणि तो दोन महिन्यापर्यंत बंदिस्त खडयामध्ये ठेवणे. या साठवून ठेवलेल्या चाऱ्यांमध्ये पोषक अशी रासायनिक घटक तयार होतात. तसाच चारा चांगल्या प्रमाणात आंबल्याने तो चवीला स्वादिष्ट लागतो. यालाच मुरघास म्हणतात.

 मुरघासासाठी खड्डा कसा असावा

 खड्याच्या रचना,आकार आणि बांधणीहे तेथील हवामान तसेच तेथील परिस्थिती आणि जनावरांच्या संख्येवर अवलंबून असते. पाण्याचा कचरा होणारा खड्डा त्यासाठी उंचावरील जागेवर खड्डा काढावा लागणार आहे. खड्याची आतून जर शक्य असेल तर सिमेंटचे प्लास्टर लावावे त्यामुळे खड्डा मजबूत होतो. खड्याची उंची नेहमी रुंदी पेक्षा जास्त असावी.

 मुरघास बनवण्याची प्रक्रिया

 मूरघास करण्यासाठी चारा फुलोऱ्यात असेल त्यावेळी कापणी करावी.कापणी केलीकी चारा शेतात दिवसभर सुकतठेवावा.कारण मुरघासासाठी जो चारा लागतो त्यामध्ये 60 टाकले ओलावा असावा. चारा सुकला  की अर्धा ते एक इंचापर्यंत कटरच्या सहाय्याने त्याचे बारीक तुकडे करावे.

मुरघास मध्ये पौष्टिकता यावी म्हणून त्याच्या प्रत्येक थरावर दोन टक्के युरियाचे द्रावण पसरावे. खड्या मध्ये पूर्ण चारा भरल्यानंतर तो हवाबंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी तो चांगला दाबून त्यावर पालापाचोळ्याचा थर देऊन त्यावर शेण मातीचा लेप द्यावा.

मुरघासाचे फायदे

ज्या वेळी हिरवा चारा उपलब्ध नसेल त्यामुळे मुरघास उपयोगी पडतो त्यामुळे जास्त प्रमाणात मुरघास करणे कधीही चांगले असते. उन्हाळ्यात दुभत्या जनावरांची दुधाची क्षमता टिकवून ठेवायची असेल तर मुरघास उपयोगी पडतो तसेच यामुळे जनावरांचे आरोग्य सुद्धा चांगले असते

English Summary: murghaas is benificial fodder for animal that help to growth in milk production
Published on: 01 February 2022, 10:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)