Animal Husbandry

भारत हा कृषीप्रधान देश असूनभारतीय शेतकरी शेतीसोबत पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. पशुपालना मध्ये दुधाचे उत्पादन हा एक उत्पन्नाचा प्रमुख आर्थिक स्त्रोत आहे.

Updated on 25 May, 2022 12:36 PM IST

 भारत हा कृषीप्रधान देश असूनभारतीय शेतकरी शेतीसोबत पशुपालन हा व्‍यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. पशुपालना मध्ये दुधाचे उत्पादन हा एक उत्पन्नाचा प्रमुख आर्थिक स्त्रोत आहे.

पशुपालना मध्येजनावरांच्या जातिवंत जातींची निवड चांगल्याउत्पन्नासाठी महत्त्वाचे असतात. आता पशुपालना मध्ये बरेच शेतकरी म्हैस पालन करतात. म्हशीमध्ये सुद्धावेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत. परंतु या जातींमध्ये मुऱ्हा म्हशीची जात खूप फायदेशीर आहे. लेखामध्ये आपण ही जात इतर म्हशींच्या जाती पेक्षा कशी वेगळी आहे हे जाणून घेऊया.

मुऱ्हा म्हैस असते इतर जातींपेक्षा वेगळी

 साधारणपणे या जातीची म्हैस तिच्या दुधाच्या मोठ्या प्रमाणासाठी ओळखले जाते.म्हशीच्या इतर जातींपेक्षा ती अनेक प्रकारे वेगळे आहे. जातीच्या म्हशी चे वजन जास्त असते आणि ही सामान्यतः हरियाणा, पंजाब या सारख्या भागात मोठ्या प्रमाणात पाळली जाते.तसेच विदेशात बल्गेरिया, इजिप्त,  इटली या देशात देखील दूध व्यवसायासाठी या म्हशी पाळल्या जातात.

या जातीची ओळख

 जातीची म्हैस अगदी दुरूनही ओळखता येते. रंगाने काळी असून डोक्याचा आकार खूपच लहान असतो. त्या म्हशीची शेपटी व इतर म्हशीच्या तुलनेत खूप वेगळी असते. शेपटी खूप लांब असते.

 पण तुम्हाला पशुपालन हा व्‍यवसाय मुरा जातीची म्हैस पालन करून करायचा असेल तरखरेदी करताना किंमत जवळपास एक लाख रुपयांपर्यंत असते. तर काही मुऱ्हा म्हशी तीन ते चार लाख रुपयांपर्यंत देखील येतात. जातीच्या म्हशी चे वैशिष्ट्य म्हणजेते जास्त दूध देणे हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

दररोज 20 लिटरपेक्षा जास्त दूध देते.या प्रमाणाचा विचार केला तर इतर जातींच्या म्हशीच्या तुलनेत हे दुप्पट आहे.या जातीच्या म्हशी अनेकदा 30 ते 35 लिटर दूध देण्यास सक्षम असतात.

 अनेक शेतकऱ्यांचा मुऱ्हा म्हैस पाळण्याकडे कल

या जातीच्या म्हशी कुठल्याही प्रकारच्या वातावरणात सहज टिकाव धरतात.त्या जातीच्या म्हशीची शिंगे वळलेली असतात. त्या पंजाब आणि हरियाणा राज्यासह देशातील इतर भागात देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. हरियाना मध्ये मुऱ्हा जातीच्या म्हशींना काळ सोने म्हटले जाते.

अलीकडच्या काळामध्ये या म्हशीची खरेदी आणि विक्री ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने देखील होत आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Breaking : केंद्र सरकारच आहे शेतकऱ्यांचा शत्रू? आता साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची तयारी सुरु

नक्की वाचा:Seed News:सोयाबीनचे 'हे' वाण आहेत रोग आणि किडी साठी प्रतिरोधक, सोयाबीनच्या या नव्या वाणांचे संशोधन

नक्की वाचा:ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला नुकसानीचा पहिला हप्ता, शेतकऱ्यांना दिलासा

English Summary: murah buffelo is so benificial and give more production
Published on: 25 May 2022, 12:36 IST