Animal Husbandry

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आपल्या दुग्ध व्यवसायात वाढ करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी जनावरांचे आरोग्य, त्यांचे खाद्य याविषयी सतर्क राहणे आवश्यक असते. दुधाळ जनावरांना थायलेरियासीस, कासदाह, किटोसिस हे आजार होतात. तसेच गोचिडांमुळे जनावरांना विविध रोग होतात.तसेच गोठ्यात जनावर जेथे उभी राहतात तेथे शेण, मल-मूत्र पडत असल्याने ती जागा कायम ओली राहते आणि जनावरे त्यावरच बसतात, त्यामुळे कासदाह रोग होतो. यातून मुक्तता मिळावी म्हणून शेतकरी नवनवीन पद्धतींचा वापर करताना दिसतात, त्यातीलच एक मुक्त संचार गोठा पद्धत आहे.

Updated on 03 November, 2023 2:01 PM IST

मुक्त संचार पद्धतीने गोठा तयार करावचा म्हणजे फार मोठा खर्च येईल या शंकेने काही शेतकरी याकडे वळत नाहीत. शेतकऱ्यांकडे उपलब्ध भांडवलामध्ये अत्यंत कमी खर्चापासून ते जास्त खर्चाच्या आधुनिक पद्धतीचा गोठा तयार करता येतो. मुक्तसंचार गोठा पद्धतीनध्ये जनावरंना बांधले जात नाही. गाईंना एका मोठ्या कंपाऊंड मध्ये शेड बांधून मोकळे सोडले जाते. त्यांच्या चाऱ्याची व पाणी पिण्याची व्यवस्था गोठामधील एका बाजूस करण्यात येते. तसेच या गोठ्यातील शेण वारंवार काढले जात नाही.

मुक्तसंचार गोठा बांधणी -
एका गाईला किंवा म्हैशीला मोकळे सोडण्यासाठी कमीत कमी २०० चौ. मी. जागा लागते. गाईला मुक्त सोडण्यापूर्वी तार जाळीचे किंवा भिंतीचे अर्ध्या जाळीयुक्त कंपाउंड करावे.गोठ्यामध्ये पाण्याचा हौद बांधून पाण्याची व्यवस्था करावी. गाईला मोकळे सोडल्यावर एक ते दोन दिवस मुक्त पद्धतीची सवय लागण्यात जातात.

मुक्त संचार गोठा पद्धतीचे फायदे -
गोठा बांधण्यासाठी खर्च कमी होतो
कासदाह सारखे रोग कमी होतात
प्रजननासंबंधी समस्या कमी होतात
खुरांची योग्य निगा करता येते
जनावरांची झपाट्याने वाढ होते व उत्पादन वाढते
जनावरांना मोकळे वातावरण मिळाल्याने ते निरोगी राहतात

English Summary: Mukt Circulation Cattle Systems for Dairy Growth
Published on: 03 November 2023, 02:01 IST