सरकारी कर्मचाऱ्यांची एक दिवसाची पगार कपात होणार आहे. हा पैसा गो संरक्षणासाठी वापरला जाणार आहे. अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे. कर्नाटकमधील भाजप सरकारने गो रक्षणासाठी नवा निर्णय घेतला आहे.
कर्नाटक राज्याच्या वित्त विभागाने यासंबंधी आदेश काढला आहे. कर्नाटकमधील भाजप सरकारने गो रक्षणासाठी नवा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची एक दिवसाची पगार कपात होणार आहे.
''पुण्यकोटी दत्तु योजना'' या नावाने ही मोहीम राबवली जाणार आहे. भाजपशासित राज्यांमध्ये गो संरक्षणासाठी ही योजना सुरु केली जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून एकवेळ ही रक्कम कपात होईल.
या वेतन कपातीमधून राज्य सरकार ८० ते १०० कोटी रुपये निधी उभा करणार आहे. खरं तर ही योजना मागच्या वर्षीच सुरु झालेली आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना गो-पालनासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे.
अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना १२८६ कोटींचा निधी मंजूर; राज्य शासनाचा मोठा निर्णय
कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात झालेला निधी पशुसंवर्धन विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं सरकारने सांगितलं. यापूर्वी या योजनेमध्ये ऐच्छिक दान करण्याचा पर्याय होता. मात्र आता कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे कपात होणार आहेत.
खुशखबर! कामगारांना मिळणार दहा हजार रुपये; कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे मोठी घोषणा
ज्या कर्मचाऱ्यांना अशी कपात नको असेल त्यांना याचं कारण द्यावं लागले. आपल्या विभागप्रमुखांना याबाबत अर्ज करावा लागणार आहे. २५ नोव्हेंबरपूर्वी याबाबत विभागप्रमुखांना लेखी कळवावं लागणार आहे. शिपाई, स्वच्छता कर्मचारी आणि डी ग्रेड कर्मचाऱ्यांना यातून मुभा मिळणार आहे.
कर्मचाऱ्यांचे पगार पुन्हा वाढणार, 8 व्या वेतन आयोगाबाबत आली ही मोठी अपडेट
Published on: 18 November 2022, 02:12 IST