Animal Husbandry

जर आपल्याला एखादा आजार झाला तर आपण आपल्या समस्या इतरांना सांगतो आणि त्यावर उपचार करतो, पण वन्य प्राणी हे करू शकत नाहीत. जेव्हा हे प्राणी एखाद्या रोगाच्या कचाट्यात येतात तेव्हा ते त्यांच्या समस्या इतरांना सांगू शकत नाहीत. अशा परिस्थितीत पशुपालनाची भूमिका महत्त्वाची ठरते.

Updated on 19 September, 2021 10:48 AM IST

जर आपल्याला एखादा आजार झाला तर आपण आपल्या समस्या इतरांना सांगतो आणि त्यावर उपचार करतो, पण वन्य प्राणी हे करू शकत नाहीत. जेव्हा हे प्राणी एखाद्या रोगाच्या कचाट्यात येतात तेव्हा ते त्यांच्या समस्या इतरांना सांगू शकत नाहीत. अशा परिस्थितीत पशुपालनाची भूमिका महत्त्वाची ठरते.

 पशुपालक प्राण्यांमधील लक्षणे बघतात आणि त्यांचे रोग ओळखतात, परंतु अनेक वेळा पशुधन मालक जनावरांमध्ये रोगाच्या लक्षणांपासून अनभिज्ञ राहतात. त्याचा परिणाम असा होतो की जनावरे योग्य उपचार न मिळाल्याने मरतात, त्यामुळे पशुधन मालकांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागते.

 पण आता या सर्व समस्या लक्षात घेऊन भारतीय कृषी संशोधन परिषदेने असे अँप लॉन्च केले आहे, जे पशूंना होणारे रोग पशुधन मालकांना फक्त एका क्षणात सांगेल. या अँपबद्दल आम्ही सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही ही माहिती पूर्ण वाचा आणि आपले पशुधन सुरक्षित करा.

कसे काम करणार हे अँप्लिकेशन

या अँपचे नाव आहे IVRI Disease Control  जे की भारतीय पशु संशोधन परिषदेने पशुपालक शेतकऱ्यांसाठी सुरू केले आहे. हे अँप तुम्हाला फक्त तुमच्या गु्रांमध्ये होणाऱ्या आजाराबद्दलच नाही सांगणार, तर तुम्हाला रोग टाळण्यासाठी उपाय देखील सांगेल. या अँपमध्ये प्राण्यांना होणाऱ्या आजारांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

तुम्ही ते गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करू शकता. घरी बसल्या-बसल्या हे अँप तुम्हाला लक्षणांच्या आधारावर पशुच्या रोगाबद्दल सांगेल. यासोबतच त्या रोगाच्या उपचाराची माहितीही दिली जाईल. विशेष गोष्ट म्हणजे अँपमध्ये दिलेली सर्व माहिती व्हिडीओच्या स्वरूपात असेल, जी तुम्ही ऐकूनच नव्हे तर बघूनही चांगल्या प्रकारे समजू शकता.

 आयसीएआरने लॉन्च केलेले हे अँप पशुधन मालकांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. आता आपण पशुमध्ये सामान्यतः दिसणाऱ्या काही आजारांबद्दल जाणून घेऊया.

 

पशुना होणारे विविध रोग

पशु विविध प्रकारच्या आजारांना बळी पडतात, जे प्रामुख्याने थ्रश, फथा / रूमिनल टायम्पेनिया, ट्रॉमॅटिक रेटिकुलो पेरिटोनिटिस केटोसिस, दुग्ध ताप, रूमिनल, इम्पिंगमेंट असे अनेक रोग आहेत.

 साधारणपणे असे दिसून येते की पशुधन मालकणा जनावरांमध्ये होणारे हे रोग ओळखता येत नाहीत, हे लक्षात ठेवून हे अँप खूप उपयुक्त ठरू शकते. या अँपची खास गोष्ट म्हणजे यामध्ये मादी प्राण्यांना होणाऱ्या आजारांबद्दलही तपशीलवार सांगितले गेले आहे.

English Summary: mobile application give information about animal disease
Published on: 19 September 2021, 10:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)