Animal Husbandry

जनावरांच्या शरीराच्या निकोप वाढीसाठी व शरीरक्रिया साठी आहारातून आवश्यक ती जीवनसत्त्वांची गरज भागवणे आवश्यक असते.जर जनावरांमध्ये जीवनसत्वाची कमतरताअसली तर जनावरांचे स्वास्थ्य बिघडते.गुरांच्या आहारात प्रथिने,पिष्टमय पदार्थ,स्निग्ध पदार्थव खनिजद्रव्ये याशिवाय इतर अन्नद्रव्यांची गरज असते.या लेखात आपणजनावरांना आवश्यक असणारे जीवनसत्वाचे फायदे व अभावामुळे होणारे नुकसान त्याबद्दल माहिती घेणार आहोत.

Updated on 23 September, 2021 9:06 PM IST

 जनावरांच्या शरीराच्या निकोप वाढीसाठी व शरीरक्रिया साठी आहारातून आवश्यक ती जीवनसत्त्वांची गरजभागवणे आवश्यक असते.जर जनावरांमध्ये जीवनसत्वाची कमतरताअसली तर जनावरांचे स्वास्थ्य बिघडते.गुरांच्या आहारात प्रथिने,पिष्टमय पदार्थ,स्निग्ध पदार्थव खनिजद्रव्येयाशिवाय इतर अन्नद्रव्यांची गरज असते.या लेखात आपणजनावरांना आवश्यक असणारेजीवनसत्वाचे फायदे व अभावामुळे होणारे नुकसान त्याबद्दल माहिती घेणार आहोत.

 जीवनसत्वाचे दोन प्रकार असतात

  • स्नीग्धात विरघळणारी जीवनसत्त्वे– अ,ड,इ, के
  • पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे- ब आणि क

स्नीग्धात विरघळणारी जीवनसत्त्वे

  • जीवनसत्व अ:
  • यामुळे जनावरांच्या पचनसंस्थेच्या अवयवांचा आतील स्तर चांगला राहतो.
  • जनावरांच्या वाढीसाठी,रोगप्रतिकारक शक्ती साठी व प्रजननक्षमता अबाधित ठेवण्यासाठी हे जीवनसत्त्व उपयोगी आहे.

जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे नुकसान

  • हा जीवनसत्वाच्या अभावाने रातांधळेपणा होतो.
  • जनावर लवकर माजावर येत नाही.
  • स्त्रीबीजांड बाहेर पडण्याचीक्रीया लांबते.
  • मुका माज सारखे अभाव दिसून येतात.

हिरवा मका,हिरवे गवतइत्यादीतून हे जीवनसत्त्व उपलब्ध होते.

जीवनसत्व ड :

फायदे – जीवनसत्व हे कॅल्शियम व स्फुरदाचे रक्तात रूपांतर करण्यासाठी आवश्यक असते.

 जीवनसत्व चा अभाव मुळे होणारे नुकसान

 ड जीवनसत्वाच्या अभावाने मुडदूस हा रोग होतो. रक्तातील कॅल्शिअम व स्फुरदाचे शोषण योग्य प्रकारे होत नाही. जनावरांना दातांचा विकार व हाडे ठिसूळ बनतात.गुडघ्यामध्ये पोकळी तसेच सांध्यांचेआजार असे विकार होतात.

ड जीवनसत्वाची उपलब्धता

ड जीवनसत्व हे कोवळ्याकिरणांपासून  मिळते.त्यामुळे जनावरे काही वेळ सकाळच्या कोवळ्या उन्हात बांधावीत.उन्हात वाळलेले गवत भरपूर प्रमाणात द्यावे.

  • जीवनसत्व इ:

फायदे- जीवनसत्व ई व सेलेनियम चा संयुक्त पुरवठा केल्यास जनावरे उलटन्याचे प्रमाण कमी होते.शरीर निकोप ठेवण्यासाठी तसेच कातडी निरोगी ठेवण्यासाठी हे जीवनसत्त्व फार महत्त्वाचे आहे. तसेच प्रजननासाठी आवश्यक आहे.

 जीवनसत्व इ चा अभावामुळे होणारे नुकसान

 हृदयाच्या स्नायूंवर विपरीत परिणाम होतो.या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे प्रजननाचे वंध्यत्वाचे रोग होतात.जनावर माजावर येत नाही.

 उपलब्धता- प्रजनन क्षमतेची उणीव दिसून आल्यास जीवनसत्व इचे इंजेक्शन द्यावे. हिरवे पदार्थ व चारा व धान्य पदार्थात रूपांतर करून देणे.

 

  • जीवनसत्वके:

फायदे- रक्त गोठविण्यासाठी फायदेशीर

अभावा मुळे होणारे नुकसान

जर एखादी जखम झाली तर जखमेतून रक्तस्त्राव जास्त होतो.

 उपलब्धता- सर्व प्रकारच्या हिरवा चारा हे जीवनसत्त्व खाद्यातून द्यावे लागते.

पाण्यात विरघळणारे जीवनसत्व

  • जीवनसत्व ब

फायदे- मज्जातंतू कार्यान्वित होण्यासाठी फायद्याचे आहे तसेच हे जीवनसत्व चयापचयाच्या क्रियेला चालना देते.

आभावा मुळे होणारे नुकसान

 याच्या अभावी मज्जातंतू सुजणे, स्नायूंची हालचाल न होणे ही लक्षणे दिसतात.

English Summary: minerals and vitamins useful in animal
Published on: 23 September 2021, 09:06 IST