Animal Husbandry

भारत हा कृषिप्रधान देश आहे. पण शेतकऱ्यांला कधीच चांगले आणि सुखाचे दिवस आले नाहीत. एखादे पिक घेतले तर त्याला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहेत. सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रात बदल करत असून शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न दुपट करण्याचा प्रयत्न करत आहे.

Updated on 25 August, 2020 12:56 PM IST

भारत हा कृषिप्रधान देश आहे. पण शेतकऱ्यांला कधीच चांगले आणि सुखाचे दिवस आले नाहीत. एखादे पिक घेतले तर त्याला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहेत. सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रात बदल करत असून शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न दुपट करण्याचा प्रयत्न करत आहे. पण या पलीकडेही शेतकऱ्यांसाठी शेतीशी निगडीत असे काही व्यवसाय आहेत की त्यामुळे शेतकरी लाखोंचे उत्पन्न कमवू शकता. शेतीशी निगडीत असलेले व्यवसाय यात डेअरी व्यवसाय, शेळीपालन, पोल्ट्री, मत्स्य पालन, मेढींपालन, असे जोडव्यवसाय करून शेतकरी त्यांचे वार्षिक उत्पन्न दुपट करू शकतात.

 

डेअरी व्यवसाय –  डेअरी व्यवसाय सर्वाेत्तम आणि आयुष्यभर चालणार व्यवसाय आहे. डेअरीमधून शेतकरी चांगला नफा कमवू शकतो. व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांकडे जर जास्त जनावरे असतील तर त्याला त्यातून जास्त उत्पन्न मिळू शकते. भांडवल कमी जरी असेल तरी डेअरीचा व्यवसाय सुरु करू शकतात.

 


मत्स्य पालन – शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते. यामुळे अनेक शेतकरी शेततळे तयार करत आहेत. जर त्याच तळात मत्स्य शेती केली तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होता, किंवा ते कमावू शकतात. जर कमी जागा असेल तरी हा व्यवसाय करता येतो पण त्यातून उत्पन्न कमी मिळते. तसेच साधारणता १ एकराच्या शेततळ्यात मत्स्य शेती केली तर ९ ते १० लाख रूपये कमवू शकतात. विशेष म्हणजे या शेतीसाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. आपण त्याच्या मार्फत हा व्यवसाय सुरू करु शकतात.

 

शेळीपालन – कमी खर्चात जास्त नफा देणारा हा व्यवसाय आहे. यासाठी जास्त मंजूराचीही आवश्यकता भासत नाही. यासाठी तुमच्याकडे थोडी जरी शेती असेल तरी चालते. कोणत्याही परिस्थितीमध्ये शेळ्या जगत असल्याने यात नुकसान होणे फार कमी असते. शेळीपालन करण्यासाठी जिल्हा परिषदेकडूनही अनुदान दिले जाते. 

 

मेंढी पालन – हा शेळी पालनासारखा व्यवसाय आहे. यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होता. मेंढीची मागणी मांस आणि दुधासाठी केली जाते. तसेच मेंढीपासून मिळणारे लोकर याला बाजारात मोठी मागणी असून किंमतही चांगली मिळते.

English Summary: Millions of rupees will be earned, start these side businesses
Published on: 25 August 2020, 12:56 IST