जगात मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय केला जात आहे. महाराष्ट्र समवेतच आपल्या देशात देखील सर्वत्र अलीकडे पशुपालन व्यवसायात (Animal Husbandry) मोठी वाढ झाली आहे. शेतीसोबत पशुपालन व्यवसाय शेतकरी बांधवांना (Farmer) दुहेरी फायदा देणारा सिद्ध होत आहे, यामुळे आता या व्यवसायाकडे अनेक शेतकरी बांधव वळू लागले आहेत.
पशुपालन व्यवसायात सर्वात जास्त गाईंचे पालन (Cow Rearing) केले जाते. गाईचे पालन (Cow Farming) करण्यामागे अनेक कारणे आहेत यापैकीच एक म्हणजे गाईचे पालन करण्यासाठी अधिक पैसा खर्च करावा लागत नाही शिवाय गाईचे पालन इतर पशुपालनाच्या तुलनेत सोपे आहे. याशिवाय देखील एक महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे सनातन हिंदु धर्मात गाईला देवतेचे स्थान दिले जाते यामुळे गाईचे पालन करून गायीची सेवा देखील केली जाते शिवाय यातून उत्पन्नदेखील मिळत असते.
एकंदरीत गाईचे पालन शेतकरी बांधवांसाठी अनेक मार्गांनी फायद्याचे ठरत आहे. मित्रांनो जर आपण देखील गाय पालन करू इच्छित असाल तर जर्सी गाईचे पालन (Jersey cow rearing) आपल्यासाठी विशेष फायदेशीर ठरू शकते. आज आपण जर्सी गाईविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
हेही वाचा:-Milk Production: गायी- म्हशीपासून अधिक प्रमाणात दूध कसं मिळवणार, जाणून घ्या सर्व माहिती
जर्शी गाईविषयी काही महत्वाची माहिती
- मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, भारतीय गायींना देशी गाय म्हणून संबोधले जाते आणि ब्रिटनमधील जर्सी बेटातील गाईला जर्सी गाय म्हणून ओळखले जाते.
- भारतीय देशी गायींचा रंग एक किंवा दोन रंगांच्या मिश्रणाने बनत असतो, परंतु जर्सी गायींचा रंग हलका पिवळा असतो, ज्यावर पांढरे चट्टे राहतात. काही जर्सी गाईंचा रंग हा हलका लाल किंवा बदामी असतो.
- जर्सी गायीचे डोके लहान असते याशिवाय पाठ आणि खांदे एका सरळ रेषेत असतात. म्हणजेच जर्सी गाय आपल्या भारतीय देशी गाई सारखी लांब शिंगे, मोठ कुबड अशी दिसत नाही.
- जर्सी गायींची उंची देशी गाईंपेक्षा अधिक असते, आपल्या भारतीय देशी गाई जर्सी गाईच्या तुलनेत आकाराने लहान असतात.
- आपल्या देशी गाईची वाढ निसर्ग, हवामान, चाऱ्याची उपलब्धता आणि काम करण्याच्या पद्धतींवर अवलंबून असते. मात्र, जर्सी गायीचा विकास थंड हवामान असले तर चांगला होतो. त्यांना उष्ण तापमान सहन होतं नाही. चांगल्या उत्पादनासाठी या जर्सी गाईना थंड हवामान आवश्यक आहे.
- जर्सी गाय आपल्या देशी गाईच्या तुलनेत अधिक दुध देते ही गाय चांगली दूध देणारी गाय म्हणून ओळखली जाते. यामुळे या गाईचे सर्वात जास्त पालन केले जात असते. जर्सी गाय दररोज 12 ते 14 लिटर दूध देण्यास सक्षम असल्याचा दावा आहे. मात्र, देशी गाय दररोज फक्त 3 ते 4 लिटर दूध देऊ शकते.
हेही वाचा:-बातमी कामाची! देशी गाई संभाळा आणि लाखो कमवा, ३३ प्रकारची अन्नद्रव्ये होतात तयार, वाचा सविस्तर
यामुळेच जर्सी गाईचे पालन आपल्या देशात झपाट्याने वाढत आहे. पशुपालक शेतकऱ्यांसाठी जर्सी गाईचे पालन विशेष फायदेशीर ठरू शकते. देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात दुग्धोत्पादनासाठी गायीचे पालन केले जात असल्याने जर्सी गाईचे पालन पशुपालक शेतकऱ्यांना विशेष रास येत आहे.
हेही वाचा:-बातमी कामाची! आता गोवंश पालन करण्यासाठी सरकार देणार 25 लाखाचे अनुदान
Published on: 08 April 2022, 10:53 IST