अनेक ठिकाणी दुधात पाणी मिसळून दुधाचे उत्पादन वाढवले जाते. अशाचप्रकारे दूध संकलन केंद्रावर (Milk Collection) देखील दुधाची योग्य पद्धतीने मोजणी न करता शेतकऱ्यांची लूट होताना दिसते. आता अशा दूध लुटारूंना चाप लावण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्य सरकारने दुधाच्या मोजमापासाठी मिल्कोमीटर (Milkometre) प्रत्येक दूध संकलन केंद्रावर असणे बंधनकारक करणार आहे. यासाठी शासन आता यावर अंमलबजावणी सुरु करत आहे. यामुळे शेतकऱ्यांची लूट थांबणार आहे. अनेक ठिकाणी याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या आहेत.
वजन काटे वैधता प्रमाणीकरण विभाग आणि अन्न व पुरवठा विभाग या दोन शासकीय विभागांना याबाबतची जबाबदारी देण्यात आली आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दूध केंद्रावर मिल्कोमीटर लावण्याची मागणी केली. त्यानंतर ती मागणी राज्य सरकारने मान्य केली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
PNG-CNG चे दर कमी होणार, दर महिन्याला ठरणार दर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय..
काहीच दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च मोर्चा काढला होता. त्या मोर्चात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शेतकऱ्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत दूध संकलन केंद्रावर मिल्कोमीटर आणि वजन काटे लावण्यात यावे अशी मागणी केली.
आयकर विभागाकडून देशातील जनतेवर ४४ हजार कोटीची दरोडा, राजू शेट्टी यांच्या आरोपाने खळबळ
ती मागणी सरकारने पूर्ण केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळाला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक थांबणार का? हे लवकरच समजणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान...शेतकऱ्यांनो द्राक्षाचे पूर्ण पेमेंट मिळण्याबाबत खातरजमा करा, फसवणूकीपासून सावध रहा..
दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता शरद पवार मैदानात, केली मोठी मागणी..
Published on: 10 April 2023, 09:46 IST