Animal Husbandry

मिल्क रिप्लेसर म्हणजे अन्नघटकांचे कोरड्या व पावडर स्वरूपातील मिश्रणाला मिल्क रिप्लेसर असे म्हणतात. वासरांना देण्याआधी ते पाण्याबरोबर मिसळले जाते व नंतर वासरांना खायला दिले जाते.मिल्क रिप्लेसर पोस्टीक असते.वासरांच्या पचनसंस्थेची भौतिक, शारीरिक वाढ चांगली होण्यासाठी मिल्कप्लेसर उत्तम असते.

Updated on 02 December, 2021 5:18 PM IST

मिल्क रिप्लेसर म्हणजे अन्नघटकांचे कोरड्या व पावडर स्वरूपातील मिश्रणाला मिल्क रिप्लेसर असे म्हणतात. वासरांना देण्याआधी ते पाण्याबरोबर मिसळले जाते व नंतर वासरांना खायला दिले जाते.मिल्क रिप्लेसर पोस्टीक असते.वासरांच्या पचनसंस्थेची भौतिक, शारीरिक वाढ चांगली होण्यासाठी मिल्कप्लेसर उत्तम असते.

मिल्क रिप्लेसर हे स्निग्ध पदार्थ विरहित दूध पावडर, जीवनसत्वे,क्षारतत्व,एंटीऑक्सीडेंट,उच्च प्रतीची प्रथिने यापासून बनवलेले असते.  या लेखात आपण मिल्क रिप्लेसर चे फायदे जाणून घेऊ.

मिल्क रिप्लेसरचे फायदे

  • वासरांच्या मरतुकीचे प्रमाण कमी होते व झपाट्याने वाढ होते.
  • वासरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.
  • कमी खर्चा मध्ये जातिवंत वासरं पासून पुढील काळात जास्त उत्पादन देणारी गाय किंवा म्हैस आपण खात्रीने तयार करू शकतो.
  • मिल्क रिप्लेसर चा वासरांच्या आहारात उपयोग केल्यामुळे वासरांसाठी जाणाऱ्या दुधामध्ये बचत होऊन सदर दूध विक्रीसाठी उपलब्ध होते.

 मिल्क रिप्लेसर मध्ये प्रतिजैविकांचा समावेश असल्यामुळेवासरांच्या आतड्याची शोषण क्षमता वाढते. त्यामुळे आहारातील जास्तीत जास्त पोषणतत्वे शरीरात शोषून त्यांचा वासरांच्या वाढीसाठी उपयोग होतो.त्याचबरोबर पचनसंस्थेतील आजार निर्माण करणाऱ्या जिवाणूंची संख्या कमी होण्यास मदत होते.

  • गाई व म्हशीच्या दुधातील घटकांचे प्रमाण हे दूध देण्याच्या काळानुसार बदलत असते. परंतु मिल्क रिप्लेसर मधील पोषक तत्वांचे प्रमाण एकसारखे असते.त्यामुळे उत्तम वाढीसाठी मिल्क रिप्लेसर पोषक ठरते.
  • मिल्क रिप्लेसर चा वासरांच्या आहारात समावेश केल्यामुळे इन्फेकशसहिनोट्राकायटीस, टीबी व इतर काही आजाराचा प्रसार टाळला जातो.
  • गायीच्या दुधातील प्रथिने ही 70 ते 75 टक्के केसीनआणि 25 ते 30 टक्के अल्बमिन युक्त असतात. केसिन ज्यावेळीॲबोमॅझममध्ये जातो त्यावेळी  चीज सारखा घट्ट थर जमा होतो.
  • त्याचे पचन होण्यास सहा तासांपर्यंत कालावधी लागतो. त्यामुळे वासरांना लवकर भूक लागत नाही. याउलट मिल्क रिप्लेसर मधील प्रतिनिधी 70 ते 75 टक्के अल्बमिन व 25 ते 30 टक्के केसीनयुक्त असतात. त्याचे  ॲबोमॅझमध्ये पचन एक ते दीड तासामध्ये वासरांना लवकर भूक लागते. त्याकाळात वासरे गवत, खुराक खाऊ शकतात. यामुळे कोटी पोटाची तसेच वासरांची जलद वजन वाढहोण्यास मदत होते.
  • वासरे लवकर खुराक खाऊ व पचवू  शकतात.
  • वासरांना गायी व म्हशी पासून लवकर वेगळे करता येते.

(संदर्भ- ॲग्रोवन)

English Summary: milk replacer is benificial for new born calf and benifit to growth
Published on: 02 December 2021, 05:18 IST