Animal Husbandry

Animal Care Update : पशुंना मोहरीचे तेल दिल्याने वासरांची तबेत देखील सुधारते. कारण सुरुवातीला काही दिवस आपण वासरांना जनावरांचे दूध पाजतो. म्हणून वासरांना देखील त्याचा फायदा होतो. थकलेल्या जनावरांना मोहरीचे तेल थोडेसे देणे फायदेशीर ठरते. विशेषत: लांबच्या प्रवासानंतर जनावरे येतात किंवा खरेदी करून आणली जातात. अशा स्थितीत अशक्तपणा आणि थकवा आल्याने ताप येण्याची शक्यता असते.

Updated on 15 January, 2024 4:34 PM IST

Animal Husbandry Update : शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. तसंच बहुतांश शेतकऱ्यांचा आर्थिक उदारनिर्वाह हा दूध व्यवसायावर अवलंबून असतो. यामुळे शेतकरी पशुची उत्तम काळजी घेतात. तसंच जनावरांचे दूध उत्पादन हे त्यांच्या आहारावर अवलंबून असल्याने खासकरुन शेतकरी त्याकडे जास्त लक्ष देतात. जनावरांना चांगला संतुलित आहार, हिरवा चारा, तेलाची पोळी आणि अन्य आहार दिल्यास जनावरांमधील दूध उत्पादन वाढते. यासोबतच त्यांची प्रतिकारशक्तीही मजबूत असते. यासाठी संतुलित आहाराचा मुद्दा होता. यासोबतच कृषी तज्ज्ञ चांगल्या दर्जाच्या दूध उत्पादनासाठी जनावरांच्या आरोग्यासाठी मोहरीचे तेल देण्याची शिफारस करतात.

जनावरांना मोहरीचे तेल देण्याचे फायदे
आजारी आणि दुर्बल प्राण्यांना मोहरीचे तेल दिल्याने त्यांच्या आरोग्यात चमत्कारीक बदल होतात. मोहरीच्या तेलात भरपूर चरबी असते. ज्यामुळे प्राण्यांना ऊर्जा मिळते आणि ते चपळ होतात. त्यामुळे गायी आणि म्हशींना मोहरीचे तेल देण्याची प्रथा आहे, जेणेकरून त्यांचे आरोग्य लवकर चांगले होईल. मोहरीचे तेल प्यायल्याने जनावरांची पचनशक्ती बळकट होते. त्यामुळे जनावरांना पोटासंबंधीचे आजार होत नाहीत.

पशुंना मोहरीचे तेल दिल्याने वासरांची तबेत देखील सुधारते. कारण सुरुवातीला काही दिवस आपण वासरांना जनावरांचे दूध पाजतो. म्हणून वासरांना देखील त्याचा फायदा होतो. थकलेल्या जनावरांना मोहरीचे तेल थोडेसे देणे फायदेशीर ठरते. विशेषत: लांबच्या प्रवासानंतर जनावरे येतात किंवा खरेदी करून आणली जातात. अशा स्थितीत अशक्तपणा आणि थकवा आल्याने ताप येण्याची शक्यता असते. अशा वेळी मोहरीचे तेल दिल्यास प्राण्यांमध्ये लगेच ऊर्जा येत. मोहरीचे तेल जनावरांना खूप उपयु्क्त असते.

उन्हाळ्यात उष्णतेपासून सुरक्षा
उन्हाळ्यात जनावरांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. त्यासाठी पशुपालक देखील पशुची मोठ्या प्रमाणात काळजी घेतात. तसंच उन्हाळ्यात जनावरांना मोहरीच्या तेलाचे सेवन दिल्यास जनावरांना उष्णता संबंधित समस्यांपासून संरक्षण मिळते. दुसरीकडे जर आपण हिवाळ्याबद्दल बोललो तर, या दिवसात मोहरीचे तेल देखील प्राण्यांमध्ये उष्णता टिकवून ठेवण्यासाठी एक फायदेशीर कृती असल्याचे सिद्ध होते. पशुतज्ज्ञांच्या मते निरोगी जनावरांना मोहरीचे तेल आणि पशुखाद्य रोज देऊ नये. या गोष्टी फक्त आजारी आणि अशक्त प्राण्यांसाठीच चांगल्या आहेत.

दरम्यान, आजारी व अशक्त जनावरांना १०० ते २०० मिली मोहरीचे तेलही दिले जाऊ शकते. यापेक्षा जास्त सेवन करणे जनावरांसाठी हानिकारक ठरू शकते. त्याचबरोबर गाई-म्हशींच्या पोटात वायू किंवा पचन खराब झाल्यास पशुवैद्यांच्या सल्ल्याने ४०० ते ५०० मिली मोहरीचे तेलही द्यावे. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने जनावरांना मोहरीच्या तेलाचे सेवन द्यावे. अन्यथा जनावरांना अन्य आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

English Summary: Milk production will increase animal feed animal care update milk rate
Published on: 15 January 2024, 04:34 IST