भारतात शेती सोबत अनेक व्यवसाय केले जातात. ज्यामधून शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. यामधीलच महत्वाचा व्यवसाय म्हणजे दुग्धव्यवसाय. हा व्यवसाय शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. आता दुग्ध व्यवसायिकांसाठी महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे.
जिल्ह्यातील दूध उत्पादन १ लाख लिटरपर्यंत नेण्यासाठी जिल्हा बँक प्रयत्नशील आहे. यानुसार सोमवारी (ता. २४) जिल्हा बँक आणि गोकुळ दूध संघ (Gokul Milk Union) यांची संयुक्त बैठक बँकेच्या प्रधान कार्यालयात झाली. जिल्ह्यात २०१३ पासून गोकुळ दूध संघ दूध संकलन करीत आहे. अनेक समस्यांवर मात करीत संघाचे काम सुरू आहे.
मागील काही वर्षांचा आढावा घेतल्यानंतर बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला जिल्ह्याचे दूध संकलन १ लाख लिटरपर्यंत न्यायचे आहे. त्यासाठी दूध संघाकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
थंडीत रिकाम्यापोटी 'या' 6 गोष्टींचा आहारात समावेश करा; आरोग्य राहील एकदम तंदुरुस्त
या वेळी दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात आलेला आनंद पॅटर्न सिंधुदुर्गात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना (farmers) होणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या काही समस्या असल्यास त्याचे निरासरण देखील होणार आहे.
शेतकऱ्यांनो हरभरा पिकाची पेरणी 'या' तारखेपासून सुरू करा; मिळेल भरपूर उत्पादन
या पॅटर्नअंतर्गत (pattern) दूध उत्पादक शेतकऱ्यांना व्यवस्थापन, गुंतवणूक या बाबत मार्गदर्शन केले जाईल. याशिवाय जिल्ह्यात गोकुळचे स्वतंत्र कार्यालय सुरू देखील करण्यात येईल. जिल्ह्यासाठी तज्ज्ञ १० अनुभव डॉक्टर देण्यात येतील असे देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
सावधान! पुढील दोन दिवस 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना मिळणार महत्वाची सुविधा
'या' सहा राशींवर असणार एक महिन्यापर्यंत सूर्यग्रहणाचा प्रभाव; कसे कराल रक्षण? जाणून घ्या
Published on: 27 October 2022, 01:43 IST