भारतामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय असून पशुपालन आणि त्याद्वारे दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा म्हणून केला जातो.दुग्ध व्यवसायाचा फायदेशीर व्यवसायआहे.अगोदर दुग्धव्यवसाय हा फक्त घराला लागणारे दूध यापुरताच मर्यादित होता.परंतु कालांतराने त्यामध्ये बदल होऊनदुग्ध व्यवसाय बद्दल असलेले दृष्टिकोन बदलले वया व्यवसायाला व्यावसायिक दृष्टीकोन प्राप्त झाला.जर आपण दुधाचा विचार केला तरदुधावर प्रक्रिया करून अनेक प्रक्रिया पदार्थ तयार करता येतात जसे की,दही,पनीर,श्रीखंड, पेढा,लस्सी असे अनेक पदार्थ यांपासून तयार करता येतात.
या लेखात आपण दुग्ध प्रक्रिया उद्योग व या उद्योगात यशस्वी होण्यासाठी लागणारे काहीआवश्यक गोष्टींची माहिती घेणार आहोत.
दुग्धपदार्थांना देशात व विदेशात प्रचंड मागणी आहे.परंतु आपल्या भारतात त्या मानाने अत्यंत अल्प प्रमाणात दुग्ध प्रक्रिया केली जाते.या व्यवसायाचे महत्त्व लक्षात घेऊनया उद्योगाकडे रोजगाराच्या संधी म्हणून पाहायला हवे.
- दुग्ध प्रक्रिया उद्योगास लागणारे आवश्यक गोष्टी
1-पहिल्यांदा आपण या उद्योगासंबंधी सगळ्या प्रकारची आवश्यक अशा प्राथमिक माहितीचा अभ्यास करावा.
- या उद्योगातून तयार होणाऱ्या पदार्थांना बाजारात किती मागणी आहे याचे सर्वेक्षण करावे.
- या सर्वेक्षणानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे गुणवत्तापूर्ण पदार्थ तयार करून त्याचे योग्य प्रकारे पॅकिंग करून विक्रीचे नियोजन करणे.
- तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरातील छोट्या-मोठ्या ऑर्डर स्वीकारून त्या पद्धतीने विक्री करणे.
या पदार्थांना बाजारपेठेत भरपूरअशी मागणी आहे. परंतु ती शोधणे व तिचा अभ्यास करून विक्री नियोजन करणे महत्त्वाचे असते विक्री. अनेक हॉटेल्स,ढाबे आणि केटरर्स या सर्वांना पनीर, खवा, तूप, दही यासारख्या दुग्धजन्य पदार्थांची आवश्यकता असते. याचा अभ्यास करून तुम्ही किती वाढवू शकता.
2- जशी मागणी असेल तसे गुणवत्तापूर्ण पदार्थ तयार करणे:
दुधापासून तयार होणारे दूध पदार्थ जसे दही, तूप, रसगुल्ला, रसमलाई,छन्ना, पनीर तसेच सुगंधी दूध, चीज सारखे पदार्थ गुणवत्ता राखून तयार करणे आवश्यक आहे.
3- योग्य प्रकारे पॅकिंग करणे फार महत्त्वाचे असते:
विविध दुग्धपदार्थांसाठी पॅकेजिंग मटेरिअल निवडतांना मूळ पदार्थ व पॅकेजिंगसाठी असलेले साहित्य यांची गुणवत्ता विचारात घ्यावी.असे साहित्य निवडताना त्याची प्लास्टिकची घनता,ताणशक्ती तसेच ऑक्सिजनची प्रवेश क्षमता तपासून खात्री पटवून द्यावी. सध्या बाजारामध्ये सहज उपलब्ध होणारी पीव्हीसी किंवा पोलिप्रोपीलेनचे प्लास्टिकचे डबे बासुंदी, गुलाबजाम व श्रीखंड यासारख्या पदार्थांचे पॅकिंग साठी वापरता येतील. तसेच मीठाई ठेवण्यासाठी कागदापासून ची वेस्टने व प्लास्टिकचे वेगवेगळे प्रकार लॅमिनेट करून वापरता येतील.तसेच पनीर व मिठाईसाठी व्याक्युम पॅकिंग वापरले जाते.
- विक्रीचे नियोजन कसे करावे?
लग्न समारंभाची मागणी लक्षात घेऊन व त्यातील जेवण केटरर्स शीसंपर्क ठेवून आपल्या दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढवता येते. तसेच विविध प्रदर्शनांमध्ये व बचत गटांच्या माध्यमातून दर स्टॉल लावले तर विक्री तर होतेच परंतु आपल्या उत्पादनांची जाहिरात देखील मोठ्या प्रमाणात होते तसेच आपल्या शहरातील शॉपिंग मॉल, सुपर मॉल्स इत्यादी विक्री प्लॅटफॉर्म ज्या ठिकाणी योग्य पद्धतीने पॅक केलेले दुग्धपदार्थ विक्रीसाठी ठेवता येतात.
- आपल्या उत्पादनाचे ब्रॅण्डिंग करणे:
स्वच्छ, शुद्ध योग्य मूल्यवर्धित आणि पॅकेजिंग केलेले दुग्धपदार्थ तयार करून ग्राहकांमध्ये आपल्या उत्पादन विषयी विश्वास निर्माण करणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे आपण तयार करत असलेल्या उत्पादनाचा ब्रँड विकसित करणे फार महत्त्वाचे असते.
- दुधापासून तयार करावी तर नावीन्यपूर्ण दुग्ध पदार्थ:
बदलत्या जीवनशैलीमुळे पौष्टिक,शुद्ध, नैसर्गिक रंग आणि रसायनविरहित पदार्थांकडे लोकांचा कल अधिक वाढतोय. त्यानुसार नियोजन करून स्थानिक उपलब्धतेनुसार दुग्धपदार्थात फळांचा वापर, कमी फॅटचे दूध पदार्थ,कमी कॅलरीचे पदार्थ,तंतुमय पदार्थांचा वापर करून मूल्यवर्धन करता येईल.दुग्धपदार्थ तयार करत असताना मिळणारे उपपदार्थ जसे स्कीम मिल्क जेसाय काढल्यानंतरमिळते. तसेच निवळी जी पनीर आणि छन्ना तयार करताना मिळते. या प्रक्रिया अत्यंत सहज व सोप्या पद्धतीने करता येतात.
Published on: 02 September 2021, 05:52 IST