हिवाळ्यात साधारपणे गाई आणि म्हशींमध्ये दुग्धज्वर आजार पाहायला मिळतो. दुग्धज्वर आजारालाच मिल्क फिवर असेही म्हणतात. हा आजार मुख्यत्वे संकरित गाई व म्हशींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. दुग्धज्वर रोग प्रामुख्याने रक्तातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हा रोग होतो. हा आजार संकरित गाई व म्हशींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. तसेच या रोगाचा प्रार्दुभाव ५ ते १o वर्षे वयाच्या गाई आणि म्हशींमध्ये जास्त आढळून येतो. गाई, म्हशीं विल्यानंतर त्यांच्या शरिरीतील कॅल्शियम कमी होत असल्याने विल्यानंतर काही दिवसांतच या रोगाची लक्षणे दिसून येतात.
आजाराची लक्षणे -
या आजारातील सूरूवातीचे काही दिवस प्रार्दुभाव कमी असल्याने लक्षणे लवकर लक्षात येत नाही. या आजारात जनावर सुस्त होते. चारा खाणे खाते त्यामुळे दूध कमी देते . सतत डोके हलविणे , जीभ बाहेर काढणे , दात खाणे , . शरीर थंड पडणे, शेण व लघवी बंद करणे त्यामुळे रवंथ करणे थांबून पोट फुगणे, अडखळत चालणे, या आजाराची लागण झाल्यास अशक्तपणामुळे जनावरे जास्त वेळ उभे राहू शकत नाही. या रोगाचा प्रार्दुभाव जास्त झाल्यास जनावरचा श्वास मंद होतो. लावला असता पापण्यांची हालचाल होत नाही. या अवस्थेत उपचार झाला नाही, तर जनावर दगावते.
आजाराची कारणे -
रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे हे या आजाराचे मुख्य कारण आहे. जनावरांना चाऱ्यातून कमी प्रमाणात कॅल्शियम मिळणे. जनावरांच्या आहारात कॅल्शियम व स्फुरदाचे योग्य प्रमाण नसणे. ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता होणे. विण्यापूर्वी किंवा विल्यानंतर जनावराची होणारी उपासमार तसेच विण्याच्या सुमारास जनावरावर येणारा ताण हे ही या आजाराचे कारण होवू शकते. हिरवा चारा न मिळणे व जास्त दूध उत्पादन या कारणांनी हा आजार मोठ्या प्रमाणात जनावरांमध्ये आढळतो.
उपाय -
जनावरास विण्यापूर्वी सकस आहार द्यावा.
गाभण काळात जनावराची उपासमार होवू नये याकडे विषेश लक्ष द्यावे.
गाभण काळात जनावरांना हिरवा चारा द्यावा. त्यामुळे जनावरांच्या शरिरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते.
गाभण आणि दुधाळ जनावरास उसाचे वाढे जास्त प्रमाणात खाऊ घालू नये.
पशुवैद्याच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत.
विण्यापूर्वी साधारण एक आठवडा जीवनसत्व ड’चे इंजेक्शन देणे.
Published on: 02 December 2023, 03:13 IST