महाराष्ट्राचा बराच मोठा प्रदेश विशेषतः नाशिक,अहमदनगर,सोलापूर, सातारा सांगली, पुणे आणि धुळे हे जिल्हे मेंढी पालनासाठी उपयुक्त आहेत. त्यापैकी संगमनेरी मेंढ्या इतर मेंढ्या पेक्षा सरस दिसून आले आहेत व त्यापासून निवड पद्धतीने सुधारित वाण विकसित करण्याचे काम चालू आहे. सुधारित वाहनापासून पैदास झालेले नर मेंढपाळांना मेंढ्या चे उत्पादन वाढवण्यासाठी देण्यात येतात.शास्त्रीय दृष्टिकोनातून मेंढी पालन साठी खालील महत्वाच्या बाबींकडे लक्ष द्यावे.
- मेंढी विण्यापूर्वी व वीणावर प्रमाणशीर खाद्य, भरपूर चारा द्यावा व मेंढीची उत्तम निगा राखावी.
- पोटात होणाऱ्या जंतपासून मेंढीचे संरक्षण करावे.
- मेंढ्यांचे कळप पासून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सशक्त मेंढ्यांची व नराची निवड करावी.
- मेंढ्या पासून नर तुटक ठेवल्यास नराची प्रजनन व उत्पादन क्षमता वाढते. तसेच तो मेंढ्यांना त्रास देत नाही.
- अठरा महिन्यानंतर सशक्त नर पंचवीस ते तीस मेंढ्या भरविण्यासाठी वापरता येतो.
- पैदाशीचा नर दोन वर्षांनी बदलणे आवश्यक आहे. मेंढी भरविल्या नंतर विण्यास 145 ते 147 दिवस लागतात. मेंढ्यात जून जुलै ऑगस्ट मते माजावर येतात. मेंढी गाभण होईपर्यंत प्रत्येक 16 ते 17 दिवसांनी माजावर येते. याकाळात मेंढीला भरपूर खाद्य दिल्यास मेंढी मोठ्या आकाराच्या व जास्त वजनाच्या कोकरांना जन्म देते.
या धंद्यातील नफा तोटा कुरमी, जंत व रोग यावरील तात्काळ उपाय यावर अवलंबून असतो.आपल्या हवामानात, पावसाळ्यात फारच जंतांचा उपद्रवी असतो. म्हणून पावसाळ्याच्या सुरुवातीला योग्य औषधोपचार करावेत.दर तीन महिन्यांनी मेंढ्यांना जंतांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी औषधोपचार करावा. मेंढ्यांची लोकर कातरल्यानंतर मेंढ्यांच्या अंगावरील उवा, गोचीड मारण्यासाठी मेंढ्यांना कीटकनाशक असलेल्या हौद मध्ये धुऊन घ्यावेत. गोचीड साठी मेंढ्यांच्या लोकल कातरलेल्या भागावर डेल्टामेथ्रीन म्हणजेच बुटॉक्स औषध फवारावे.
मेंढ्याचे लसीकरण व त्याचा कालावधी
- आंत्रविषार रोगासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीला मी आणि जून मध्ये आणि त्यानंतर सहा महिन्यांनी करावी.
- घटसर्प आजारासाठी मे-जूनमध्ये लसीकरण करावे व त्यानंतर सहा महिन्यांनी लसीकरण करावे.
- देवी रोगासाठी उन्हाळ्याच्या सुरुवातीस मार्च आणि एप्रिल मध्ये लसीकरण करावे.
- लाळ्या खुरकूत आजारासाठी आक्टोबर व मे महिन्यात लसीकरण करावे.
पावसाळ्यात मेंढ्यांच्या खुरामध्ये चिखला होतात. तेव्हा महिन्यातून एकदा कॉपर सल्फेट द्रावण असलेल्या उथळ हौदातून मेंढ्या ची संपूर्ण खुर बुडेल अशा सोडाव्यात.अंगावरील लोकर मशिनने काढल्यास लोकर उत्पादनात वाढ होते. अशी लोकर सलग आल्याने तिला बाजार भाव चांगला मिळतो. या पद्धतीत लोकरीचे तुकडे पडून लोकर वाया जात नाही. प्रत्येक वर्षी कळपातील निरुपयोगी मेंढ्या विकावेत.
मेंढ्यांसाठी उपयुक्त आहे झाडपाला खाद्य
झाडपाला व चवदार खाद्य पचविण्यासाठी चि क्षमता शेळ्यांमध्ये मेंढ्या पेक्षा जास्त आहे. खाल्लेल्या खाद्याच्या 70 टक्के खाद्य हा झाडपाल्याचा असते. झाडपाला व चीकातिल शेंगा या दोन प्रकारे साठवितात.
- झाडपाल्याचा मुरघास तयार करणे.
- फुलोऱ्यात आलेला झाडपाला आणि चिकात आलेल्या शेंगा या वाळवून साठवितात.
अशाप्रकारे साठविलेल्या झाडपाला आणि वाळलेल्या शेंगा त्यांचा उपयोग खाद्य म्हणून टंचाईच्या काळात करता येतो.
साठवलेला झाडपाला आणि शेंगांचा उपयोग
शेळ्या व मेंढ्यांच्या दिवसभरातील खाद्यात वाळवलेल्या झाडपाल्याचा आणि शेंगांचा उपयोग 50 टक्क्यांपर्यंत करता येतो. भरडलेली मका व तूर किंवा हरभरा भुसा वापरून तयार केलेले खाद्य मिश्रण घातल्यास वाढत्या करडांची शारीरिक वाढ उत्तम प्रकारे होते.
झाडपालातील अपायकारक पदार्थ
सुबाभूळ मध्ये मायमोसिन व इतर सर्व झाड पाल्यामध्ये टेनिन हे अपायकारक पदार्थ आहेत. प्रमाणापेक्षा जास्त झाडपाला खाऊ घातल्यास त्याचा जनावरांच्या शरीरावर अपायकारक परिणाम होऊ शकतो. सु बाभळीचा पाला जास्त खाऊ घातल्याने अंगावरील केस गळून पडतात,जनावरांची वाढ खुंटते व जनावरे रोजचा चारा आणि खुराक खात नाहीत इत्यादी अपायकारक परिणाम दिसून येतात. दिवसभरात खाऊ घातलेल्या सुबाभळीच्या चारा चे प्रमाण 1/3 पेक्षा कमी ठेवलास कुठलाही अपाय होत नाही.
Published on: 13 July 2021, 11:43 IST