Animal Husbandry

शेळी व मेंढी मधील मावा हा त्वचेचा आजार आहे. सर्व वयोगटातील शेळ्या-मेंढ्यांना हा आजार होऊ शकतो.लहान वयाच्या शेळ्या मेंढ्यांमध्ये या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. आजारांमध्ये मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे.

Updated on 10 December, 2021 5:55 PM IST

शेळी व मेंढी मधील मावा हा त्वचेचा आजार आहे. सर्व वयोगटातील शेळ्या-मेंढ्यांना हा आजार होऊ शकतो.लहान वयाच्या शेळ्या मेंढ्यांमध्ये या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. आजारांमध्ये मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे.

.या आजारामुळे शेळ्या आणि मेंढ्या अशक्त होतात. अशक्तपणा,पौष्टिक आहाराचा अभाव तसेच लहान करडांना दूध पिताना ताण येतो. त्यामुळे मेंढ्यांची आणि शेळ्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे जिवाणू व बुरशीजन्य व इतर आजारांना बळी पडून शेळ्या किंवा मेंढ्या मरतात. या आजाराची तीव्रता ही मेंढ्या पेक्षा शेळ्यांमध्ये अधिक असते.या लेखात आपण मावा या आजाराविषयी सविस्तर माहिती घेऊ.

 मावा आजाराची कारणे आणि लक्षणे

 हा विषाणूजन्य होणारा संसर्गजन्य आजार असून एका शेळी किंवा मेंढी पासून दुसऱ्यांना याचा संसर्ग होतो.  तसेच ओठ,नाकपुडी च्या बाजूला आणि तोंडामध्ये सुरुवातीला पुरळ येतात.  नंतर जखमा होऊन खपल्या दिसतात.कोणत्याही प्रकारचा ताण,इतर आजार, पुरेसे खाद्य न मिळणे, निकृष्ट दर्जाचा चारा, तोंडाला चरतांना लागलेले काटे या व इतर कारणांमुळे झालेले आजार मधून विषाणूंचा संसर्ग होतो. आजारी शेळ्या, मेंढ्यांना ओठ व हिरड्यांना झालेल्या त्रासामुळे चारा खाता येत नाही.

त्यामुळे त्या कमजोर व अशक्त होतात. या आजाराने बाधित झालेली शेळी किंवा मेंढी चांगली होण्यासाठी एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. या आजाराचा विषाणू थंड व कोरड्या हवामानात जास्त काळ तग धरू शकतो. परंतु तापमान जर अति जास्त किंवा अति कमी असेल तर या तापमानात हा विषाणू मरतो. मावा आजार झालेल्या पिल्ल्यांमध्ये सुरुवातीला हिरड्यांवर पुरळ इयत्ता व नंतर पुरळ फुटून हिरड्या लालसर होतात.त्या ठिकाणी फ्लॉवर  सारख्या गाठी सुद्धा येऊ शकतात. तोंडातील व तोंडावरील लक्षणांमुळे पिल्लांना शेळीच्या कासेतील दूध पिणे अवघड जाते. रोगग्रस्त कर्डान मार्फत दूध पिताना शेळीच्या सडाला देखील संसर्ग होऊ शकतो. त्या जागी पुटकुळ्या येऊ लागतात. सडाला बाहेरून  रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास शेळ्या करडांना दूध पिऊ देत नाही. काही वेळा शेळ्या-मेंढ्यांना कासदाह सुद्धा होतो. आजार प्राण्यांमधून मानवाला होणारारोग समूहात येतो.

 मावा आजारावरील उपाय

आजार विषाणुजन्य असल्यामुळे यावर कोणत्याही प्रतिजैविकांचा वापर होत नाही. यावर सध्या तरी कोणतीही लस उपलब्ध नाही.जखमा सकाळी आणि संध्याकाळी पोटॅशियम परमॅग्नेट चहा पाण्याने धुऊन साफ कराव्यात.तोंड व ओठांवरील जखमांवर हळद व लोणी किंवा दुधाची साय यासारखे पदार्थ लावावेत.जखमा लवकर बऱ्या होतात.बोरो ग्लिसरीन सारखे औषध लावावे.खाद्यामध्ये कोवळा लुसलुशीत चारा, कोथिंबीर, मेथी घास द्यावे. अशक्तपणा दूर करण्यासाठी लापशी,गुळ आणि पाणी यासारख्या पौष्टिक पदार्थ द्यावेत.

English Summary: mawa is dengerous disease in goat and sheep and his management
Published on: 10 December 2021, 05:52 IST