पशुपालन व्यवसाय हा वासरांच्या संगोपनावर अवलंबून आहे किंबहुना या व्यवसायाचे यश यामध्ये दडले आहे. दूध देणाऱ्या जनावरांमध्ये वासरांचा जर भक्त झाला तर दूध उत्पादनात घट येण्याची शक्यता असते. त्यामुळे पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते. त्यासाठी वासरांचे योग्य काळजी आणि व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असते. या लेखात आपण संकरित वासरांचे संगोपन आणि व्यवस्थापन याबद्दल माहिती घेणार आहोत.
अशा पद्धतीने घ्या वासरांच्या जन्मापासून ते तीन महिन्यांपर्यंत काळजी
- वासराचा जन्म झाल्यानंतर त्याचे जे वजन असेल त्याच्या दहा टक्के त्याला चीक पाजावा. कारण चिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती व विविध जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे वासरांची पचनसंस्था साफ होते व वासरू निरोगी राहते.
- वासराच्या शिंगकळ्या नष्ट कराव्यात. कारण बिन शिंगाच्या वासरांना गोट्याचा जागा कमी लागते. त्यांची हाताळणी व संगोपन करणे सोपे जाते. शिंगे जाळण्यासाठी रासायनिक पद्धतीचा किंवा उपकरण पद्धतीचा उपयोग करावा.
- नर वासरू असेल तर त्याचे खच्चीकरण करावी कारण त्याचे संगोपन करणे सोपे होते.
कालवडी वाढविण्याच्या पद्धती
1-वासराला गाय बरोबर ठेवणे, दूध काढणी अगोदर वासराला दूध पिण्यास सोडणे
2- वासरांच्या जन्मानंतर वासराला गाईपासून वेगळे करणे
3-या दोन्ही पद्धतींपैकी जी दुसरी पद्धत आहे ती अधिक दूध देणाऱ्या संकरित गाईंमध्ये वापरले जाते. या पद्धतीमध्ये वासरू गाईला दुध पिण्यासाठी सोडत नाहीत. वासराला बाटलीने किंवा भांड्यात दूध ओतून पाजले जाते.
गोठ्याची व्यवस्था
1-वासरांचे गोटे गाईच्या शेजारीच असावे.
2- वासरांच्या व्यवस्थापनात सोपेपणा आणि सुलभता यावी यासाठी त्यांचे वयोगटात विभाजन करावे.
- वासरांच्या व्यायामासाठी त्यांना मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी व तिथेमोकळे सोडावे. त्यासाठी एका वासराला दहा चौरस फूट या प्रमाणात बांधकाम करावे.
- आजारी वासरे वेगळ्या गोठ्यात बांधावीत.
- वासरांच्या संगोपनात 0 ते 3 महिने वयोगटाकडे जास्त लक्ष द्यावे.
- वासरांचे गोठे बनविताना त्या गोठ्यामध्ये तार, सळई या प्रकारचे साहित्य वापरू नये कारण यामुळे त्यांना इजा होण्याची शक्यता असते.
वासरांना होणारे संसर्गजन्य आजार
1-वासरांना सामान्यतः बुळकांडी,लाळ्या खुरकूत, घटसर्प आणि फऱ्या हे आजार होऊ शकतात.
2- या आजारांचा प्रादुर्भाव लहान वासरांना होऊ नये म्हणून वयाच्या सहा महिन्यानंतर लसीकरण करून घ्यावे.
जंतापासून वासरांचे संरक्षण
- लहान वयात वासरांना जंतांचा प्रादुर्भाव होण्याचा संभव अधिक असतो. त्यामुळे वासरे अशक्त बनतात. वासरांची वाढ खुंटते.
- वासरांना गोलकृमी, पर्ण कृमींचा प्रादुर्भाव होतो.
- वासरांचे गोचीड, गोमाशा यांच्यापासून संरक्षण करावे.(संदर्भ- ॲग्रोवन)
Published on: 04 November 2021, 11:38 IST