Animal Husbandry

आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की,वासरू जन्मल्यानंतर त्याची वाढ खुंटलेली दिसते. कारण वासरांच्या वाढीवर पुढील भविष्यातील पशुपालन व्यवसाय अवलंबून असतो.त्यामुळे वासरांचे संगोपन व्यवस्थित कसे होईल याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे फार गरजेचे असते.कारण वासरांची शारीरिक वाढ ही योग्य काळात वयात झाल्यास त्यापासून भविष्यकाळात चांगले उत्पादन मिळू शकते

Updated on 18 December, 2021 6:28 PM IST

 आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की,वासरू  जन्मल्यानंतर त्याची वाढ खुंटलेली दिसते.  कारण वासरांच्या वाढीवर पुढील भविष्यातील पशुपालन व्यवसाय अवलंबून असतो.त्यामुळे वासरांचे संगोपन व्यवस्थित कसे होईल याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे फार गरजेचे असते.कारण वासरांची शारीरिक वाढ ही योग्य काळात वयात झाल्यास त्यापासून भविष्यकाळात चांगले उत्पादन मिळू शकते

.तसेचत्यांचे शारीरिक वाढ उत्तम असल्यासत्याचा थेट परिणाम दूधउत्पादन वाढीवर होतो. या लेखाच्या माध्यमातून आपण वासरांची वाढ योग्य होण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे? याबद्दल माहिती करून घेऊ.

 वासरांची वाढ उत्तमरित्या होण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

  • जन्मजात वासरांची रोगप्रतिकारक्षमता व्यवस्थित राहावी व त्यांची वाढ व्हावी यासाठी वासरांना त्यांच्या वजनाच्या दहा टक्के व दूध वजनाच्या 10 ते 15 टक्के चीक पाजणे गरजेचे आहे.
  • नवजात वासरू तंदुरुस्त राहण्यासाठी गाय किंवा म्हैस गाभण काळात असताना त्यांच्या शेवटच्या टप्प्यात हिरवा चारा, गरजेनुसार आवश्यक खुराक द्यावा. त्यामुळे गर्भात असलेल्या वास्तूंची वाढ उत्तम होते  व जन्माला येणारे वासरू सशक्त जन्मते.
  • वासरांच्या आहारात प्रथिने युक्त खाद्याचा वापर केल्यास जसे की,मिल्क रिप्लेसरइत्यादी त्यामुळे वासरांची वाढ चांगली होते.
  • वासराचा जन्म झाल्यानंतर च्या आठव्या दिवशी वासरांना जंताचे औषध द्यावे.तसेच त्या पुढील काळातशेनाची तपासणी करून घेऊन गरज असल्यास जंतांचे योग्य औषध,योग्य मात्रेत द्यावे.
  • वासरुज्या ठिकाणी राहतात तो गोठा कोरडा ठेवावा.जेणेकरून वासरांना बाह्य परोपजीवी कीटकांचा त्रास होणार नाही.तसेच गोठा हवेशीरवगोठ्याच्या अवतीभवती दलदलकिंवा ओलावा असणार नाही याची काळजी घ्यावी.
  • वासरांना नेहमी मोकळी ठेवावे त्यांना एका ठिकाणी बांधून ठेवू नये.
  • वासरांच्या आहारामध्ये त्यांच्या वयाच्या नुसार द्विदल, एकदल चारा,वाळलेला चारा तसेच पशुखाद्य यांचापशुवैद्यकांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात वापर करावा.
  • वासरांच्या आहारात दररोज 20 ते 30 ग्रॅम क्षार मिश्रणाचा वापर करावा.
  • वासरांना केवळ नैसर्गिक गवत,कडबा किंवा सोयाबीनचे भुस्कट खाण्यास देऊ नये.
  • वासरांमध्ये जर कातडीचे,पोटाचे व आतड्यांचे आजार आढळून आल्यास तात्काळ उपचार करावेत.
  • वासरांच्या आहारात प्रोबायोटिकस इत्यादीचा वापर करावा. वासरांच्या आहारात बायपास प्रथिनांचा वापर करावा.
  • वासंती ठराविक वेळाने वजन करावे. कारण असे वजन केल्याने वासरांची वाढ व्यवस्थित होत आहे की नाही? जर होते तर किती प्रमाणात होत आहे? हे समजतेत्यानुसार वासरांच्या आहार व्यवस्थापन करता येते
English Summary: management of well growth of newborn calf and nutrition
Published on: 18 December 2021, 06:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)