पावसाळ्यातील पोल्ट्री शेडचे व्यवस्थापन

29 May 2021 10:30 PM By: KJ Maharashtra
पोल्ट्री चे व्यवस्थापन

पोल्ट्री चे व्यवस्थापन

 हवामान बदलानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल करावा लागतो. हिवाळ्यात पोल्ट्री शेड आणि बाहे वातावरणातील तापमानात गारवा निर्माण झाल्यामुळे कोंबड्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतात. हे लक्षात घेऊन थंडीच्या काळात व्यवस्थापनामध्ये बदल करावेत. पावसाळी वातावरणामुळे कोंबड्यांना आजार होतात. पोल्ट्री शेड वरील पत्रे मजबूत बांधून घ्यावेत जेणेकरून जोरात हवा, वावटळ किंवा पाऊस झाला तरी हलणार नाहीत याची काळजी घ्यावी.

   तसेच पोल्ट्री शेडच्या सभोवतालची दलदल, गवत काढून टाकावे. परिसरातील जागा स्वच्छ ठेवावी. पावसाचे पाणी साठून राहू नये म्हणून खड्डे बुजवून घ्यावीत तसेच पाणी वाहून जाण्यासाठी शेडच्या बाजूने चर खोदावेत. पावसाळ्यामध्ये शक्यतो प्लास्टिकचे पडदे वापरावेत. पडदे शेडच्या बाजूच्या लोखंडी जाळीला दोरीने मजबूत बांधलेले असावेत. पडद्यांची उघडझाप पावसाप्रमाणे करावी. दिवसा पाऊस नसेल आणि सूर्यप्रकाश असेल तर पडदे उघडावेत. पडद्यांची बांधणी ही छताच्या पायापासून दीड फूट अंतर सोडून असावी. यामुळे शेडमधील वरील बाजूने हवा खेळती राहून वातावरण चांगले राहते. पक्ष्यांना त्रास होत नाही.

   पक्ष्यांची गादी दिवसातून किमान एक वेळा तरी चांगले खालीवर हलवून घ्यावे. पोलीस गादी मुळे शेडमधील वातावरण दूषित होते. ओलसर गादी मध्ये रोगजंतूंची वाढ होते. पक्षी रोगास बळी पडण्याची शक्यता असते. चुकून गादी जास्त प्रमाणात ओली झालेली असेल तर गांधीचा तेवढाच भाग काढून बाहेर टाकावा त्याठिकाणी नवीन गादी म्हणजेच तूस टाकावी.गाडीतील आद्रता कमी करण्यासाठी शिफारसीनुसार चुना मिसळावा. शेड मध्ये माशांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ व कोरडी असावी तसेच खाद्याच्या गोण्यांमध्ये  फार मोठ्या प्रमाणामध्ये गाठी झाल्यास असे खाद्य पक्षांना देऊ नये. कोंबडी खाद्य हे तपासून घ्यावे  पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता जास्त असते. ब्रॉयलर कोंबड्यांना अशुद्ध पाणी दिले तर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. कोंबड्यांना द्यावयाच्या पिण्याच्या पाण्यामध्ये  शिफारशीत जंतुनाशके योग्य प्रमाणात मिसळावीत. पाण्याची टाकी लोखंडी असल्यास ती गंजू नये म्हणून तिला आतून व बाहेरून रेड ऑक्साईड लावून घ्यावे. दिंत सिमेंट विटांचे असल्यास आतून व बाहेरून चुना लावावा.

  पोल्ट्री शेड मधील लिटरचे व्यवस्थापन

 • हिवाळ्यामध्ये पोल्ट्री शेड मध्ये लिटरचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. या काळात लिटरचा ओलसर झालेला भाग काढून टाकावा.
 • ओल्या झालेल्या लिटर मध्ये चुनखडी मिसळून आद्रतेचे प्रमाण कमी करता येते. यासाठी दोन किलो चुना प्रति शंभर चौरस फुटांचा टी लिटरमध्ये मिसळावी.
 • शक्य झाल्यास संपूर्ण लिटर बदलणे चांगले परंतु यामुळे व्यवस्थापनाचा खर्च वाढतो. हाताळणीमुळे कोंबड्यांवर ताण येतो.

 

पोल्ट्री मधील पाणी व्यवस्थापन

 • हिवाळ्यात ज्या भागात पिण्याचे पाणी खुपच थंड होते त्याचे शक्य झाल्यास पाणी थोडे कोमट करून कोंबड्यांना पाजावे.
 • हिवाळ्यात पाण्याद्वारे झपाट्याने पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रथम पाण्यावर तुरटी फिरवावी. नंतर पाणी 25 तास शांत ठेवावे त्यामुळे पाण्यातील गाळ तळास बसून पाणी स्वच्छ होते.
 • त्यानंतर पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ब्रीचींग पावडरचा वापर करावा.  यासाठी एक ग्रॅम ब्लिचिंग पावडर 500 लिटर पाण्यासाठी पुरेशी होते.
 • पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी वापरावयाचे इतर औषधे पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार वापरावी.

 

 

 

कोंबड्यान वरील ताणाचे व्यवस्थापन कसे करावे

 • थंड वातावरणामुळे कोंबड्यांमध्ये येणारा ताण कमी करण्यासाठी पाण्यामधून आवश्यक जीवनसत्वे द्यावी. यामध्ये जीवनसत्त्व ब आणि क किंवा क्षारयुक्त पावडर किंवा ताण कमी करणाऱ्या औषधांचा पशुवैद्यकांच्या सल्ल्याने वापर करावा.
 • तान आल्यामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन कोंबड्या इतर रोगास बळी पडण्याची शक्यता असते. यासाठी कोंबड्यांना तज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य उपाययोजना करुन पाण्यातून जीवनसत्व  अ, ई व सेलेनियम चे द्रावण द्यावे.

 

 खाद्याचे नियोजन

 • हिवाळ्यामध्ये कोंबड्या जास्त खाद्य खातात याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या शरीराचे तापमान वातावरणातील बदलांमुळे कायम राखण्यासाठी त्यांना अण्णा घटकांपासून मिळणाऱ्या ऊर्जेचा बराच भाग खर्च करावा लागतो.
 • हिवाळ्यामध्ये पक्षांना आवश्यकतेपेक्षा कमी खाद्य दिल्यास ते त्यांना अपुरे पडण्याची  शक्यता असते. त्यामुळे कोंबड्यांच्या खाद्यात घटकांमध्ये आवश्यक ते बदल करून खाद्य द्यावे.
 • थंडीच्या काळात कोंबड्यांच्या आहारात उर्जा वर्धक घटकांचे प्रमाण  वाढवावे आणि प्रथिनांचे प्रमाण 2 टक्के कमी करावे. यासाठी पशु आहार तज्ञांचा सल्ला घ्यावा.
 • कोंबड्यांच्या आहारात जास्त ऊर्जा निर्माण करणाऱ्यांना घटक जसे की पिष्टमय कर्बोदके उदाहरणार्थ मका,  चोरी की त्यांचे प्रमाण वाढवावे आणि प्रथिने जसे की तेल काढलेले सोयाबीन पेंड मासळीचा चुरा, शेंगदाणा पेंड आणि सरकी पेंड यांचे प्रमाण थोडे कमी करावी.

 

 

खाद्यामध्ये ऊर्जेचे प्रमाण 3000 किलो कॅलरी वरून 3200 पर्यंत वाढवावे. कोंबड्यांच्या खाद्यामध्ये खनिज, क्षार  आणि जीवनसत्त्वे यांचे प्रमाण योग्य असावे. जीवनसत्वे अ व ई हे कोंबड्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे ते त्यांना खाद्यातून पुरविल्यास योग्य वाढ होण्यास मदत होते.

पोल्ट्री व्यवस्थापन पोल्ट्री कुकुटपालन
English Summary: Management of rainfed poultry sheds

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.