या व्यवसायामध्ये जर आपण योग्य व अचूक व्यवस्थापन केले तर आपल्याला चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. या लेखात आपण शेळीपालनाच्या विक्री व्यवस्थापना विषयी माहिती घेऊ.
शेळीपालन व्यवसायामध्ये आपल्याला दिसून येते की ईद साठी बोकड विक्रेते शेळीपालन करताना दिसून येतात. होते उलटे की ईद च्या बाजारात बोकड यांची आवक वाढल्याने अपेक्षित भाव मिळत नाही. मधुर दय आणि भरदार गोठ्यात व्यवसाय येतो. जर आपण शेळी पालन करत असताना बाजारपेठेचा व्यवस्थित अभ्यास केल्यास आपल्याला लक्षात येते की, स्थानिक बाजारात एक वर्षाच्या आतले व 20 ते 25 ग्रॅम वजनाच्या बोकडाच्या माणसासाठी मांसासाठी मागणी आहे. याच्या उलट पाहिले तर ईदसाठी एक वर्षाच्या पुढचा किंवा जास्तीत जास्त वजन असणाऱ्या बोकडांची खरेदी केले जाते. याचा अर्थ ईद साठी तयार केलेला बोकड ईदच्या बाजारात विकला गेला नाही तर पुढच्या ईद पर्यंत सांभाळण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागते.आणि या ठिकाणी शेळी पालकांचा निर्णय चुकतो.
- फायदेशीर शेळीपालनाचा मूलमंत्र
- शेळी पालन व्यवसाय सुरू करताना सुरुवातीस जास्तीत जास्त वीस शेळ्या व एक बोकड
- दोन करडे देणारी गाभण स्थानिक शेळी निवडावे.
- चारा हा घरचा असावा व त्यासाठी योग्य नियोजन करावे.
- बकरी ईद व पैदास बोकड उत्पादन विक्री नियोजन
- बोकडाचे वजन वाढीवर विशेष लक्ष देणे.
- नियमित लसीकरण व जंतांची निर्मूलन करणे.
- स्वच्छ मटण निर्मिती व निर्यातीवर भर देणे.
- चेन चा विमा काढणे उपयुक्त असते.
- उपयोगी नसलेल्या शेळ्या कळपातून काढून टाकने योग्य असते.
- सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःच्या गोट फार्म वर स्वतः लक्ष ठेवणे.
- शेळीपालनातील विक्रीव्यवस्थापनातील विविध संधी.
- मांसाचीनिर्यात
- बकरी ईद साठी बोकड तयार करणे.
- फक्त मांसासाठी शेळीपालन
- दूध व दुधाच्या वेगवेगळ्या पदार्थासाठी शेळी पालन करणे.
- शेळीच्या पैदाशीसाठी अथवा प्रदर्शनासाठी
- असेच धुलीवंदन, गटारी अमावस्या, 31डिसेंबर सारख्या दिवसांमध्ये मटणाला चांगली मागणी असते. पर्यायाने शेळ्यांना मागणी येते.
- तसेच लेंडी खतासाठी देखील शेळीपालन फायदेशीर ठरते.
- त्यामुळे आपल्याकडे जन्माला येणाऱ्या कराडा पैकी विक्री करण्यासाठी खालील नियोजन करावे.
- दहा ते 15 टक्के बोकड पैदाशीसाठी विकावेत.
- दहा ते 15 टक्के बोकड ईद साठी तयार करावेत.
- 40 ते 50 टक्के बोकड स्थानिक बाजारात विक्रीसाठी तयार करावेत.
- बोकडांची विक्री करताना शक्यतो वजनानुसार अकरावी त्याकरता बोकडाचे वजन × प्रचलित मटणाचा दर /2या सूत्राचा अवलंब करावा.
Published on: 21 February 2022, 03:37 IST