Animal Husbandry

जास्त उत्पादन क्षमतेमुळे म्हैस इतर जनावरांच्या फायदेशीर ठरते. म्हशीच्या दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण जास्त असते. शेतातील उरलेले अवशेष जसे तूस,गव्हाचा भुसा यावर प्रक्रिया करून चांगल्या प्रकारचे खाद्यबनवून त्याचा वापर म्हशीच्याआहारामध्ये करता येतो.

Updated on 31 August, 2021 4:10 PM IST

जास्त उत्पादन क्षमतेमुळे म्हैस इतर जनावरांच्या फायदेशीर ठरते. म्हशीच्या दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण जास्त असते.  शेतातील उरलेले अवशेष जसे तूस,गव्हाचा भुसा यावर प्रक्रिया करून चांगल्या प्रकारचे खाद्यबनवून त्याचा वापर म्हशीच्याआहारामध्ये करता येतो.

.महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठवाडी,पंढरपुरी आणि नागपुरी यातीन जाती आढळतात.या तीन जातींच्या म्हशीन मध्ये एकत्रितपणे दूध उत्पादन आणि काम करण्याची क्षमताही तर म्हशीच्या तुलनेत जास्त प्रमाणात आहे.

 म्हशींचे व्यवस्थापन कसे करावे?

म्हशी च्या कातडी मध्ये स्वेदग्रंथी अत्यल्प प्रमाणात असल्याने त्यांचे शारीरिक तापमान योग्य राखण्यासाठी प्रखर सूर्यकिरणांपासून त्यांचे संरक्षण करणे गरजेचे असते.गोटा उंचीवर हवेशीर जागी व भरपूर सूर्यप्रकाश येईलअशा ठिकाणी बांधावा.गोठ्यामध्ये पाण्याचा व मलमूत्राचा योग्य निचरा होण्यासाठी उपाय योजना करावी.

त्यासाठी गोठ्यामध्ये उतार काढावा. एका म्हशीसाठी साधारणतःअडीच बाय 4 मीटर जागा पुरेशी असते.पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हशींना घटसर्प,फऱ्याइत्यादी संसर्गजन्य आजारांचा  लसी टोचून घ्याव्यात.

म्हशी चा आहार कोणता असावा?

म्हशी निकृष्ट प्रतीचा चारा उदा.तूस,गव्हाचाकुठार,कडबा चांगल्या प्रकारे बसवितात व त्यातील पोषक द्रव्यशोषून त्यांचे रूपांतर दुधात करतात.म्हशींच्या शरीरात लागणारी प्रथिने, खनिजे व इतर तंतुमय पदार्थ अशा चाऱ्यापासून मिळवतात.शेंगदाण्याची डेप, सरकी ढेप म्हशी साठी जास्त उपयुक्त आहे. बरसीम गवत गव्हांडे सोबत मिसळून खाऊ घातल्यासम्हशीचीपचनक्षमता वाढण्यास मदत होते.त्याचबरोबर अशा चाऱ्यातील प्रथिने,खनिजे यांची पचन क्षमता वाढते.

 उपलब्ध खाद्य आणि धान्याचा वापर करून म्हशी चे उत्पादन वाढवता येते.घरच्या घरी खुराक तयार करण्यासाठी ढोबळ मानाने धान्य जसे मक्का,ज्वारीइत्यादी 30 ते 40 टक्के, कोणतीही उपलब्ध ढेप 25 ते 30 टक्के,डाळीची चुनी 30 ते 35 टक्के घेऊन त्यात दोन टक्के खनिज मिश्रण वएक टक्का मीठ मिसळावे.

हा खुराक तीन किलो शरीर क्रिया साठी व त्यावर दोन लिटर दुधामागे एक किलो या प्रमाणात द्यावा.साधारणपणे चारशे पन्नास किलो वजनाच्या म्हशीसाठी 8% स्निग्धांशाचे प्रमाणसात लिटर दूध देण्यासाठी व त्यासाठी सात किलो कडबा कुट्टी,चार किलो सरकी ढेप, अर्धा किलो ज्वारीचा भरडा व 30 ग्रॅम खनिज मिश्रण दील्यास अन्नद्रव्याची गरज पूर्ण होऊन म्हशी दूध देण्यात सातत्य राखतात.. योग्य प्रमाणात अन्नद्रव्य पुरविल्यास म्हशी योग्य वेळी माजावर येतातव प्रजननासंबंधी समस्या निर्माण होत नाही.

 

English Summary: management of aliment for the buffalo
Published on: 31 August 2021, 04:10 IST