Animal Husbandry

जर आपण कोंबड्यांचा विचार केला तर त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या हवामान बदला नुसार समरस होण्याची क्षमता जास्त असते. कोंबड्यांच्या बऱ्याचशा जातींमध्ये काही जाती या वातावरणाच्या अधिक प्रमाणात जुळवून घेतात तर काही फारच कमी प्रमाणात वातावरणाशी जुळवून घेतात. त्यामुळे वातावरणानुसार कुकूटपालन व्यवसाय कोणत्या प्रकारचे बदल करावेत याबद्दल या लेखात माहिती घेणार आहोत. कोंबड्यांना तुलनेमध्ये अधिक तापमानाची गरज असते. जेव्हा कोंबडी अंडी उबवते त्यावेळी तापमानाचे सरासरी ही 35 टक्यांको पेक्षा अधिक असते. अंडी फुटल्यानंतर पिल्लू ज्या वेळी बाहेर येते ती वेळ आणि त्यानंतरच्या काही तासांपर्यंतबाहेर आलेल्या पिल्लांना 34 अंश सेल्सिअस तापमान लागते.पिल्लांचे वय एक एक आठवड्याने वाढेल तसे उपलब्ध तापमानाचे पातळी 2-2 अंश सेल्सिअस ने कमी होते. पिल्लांच्या शरीराचे तापमान 13 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते. याच कारणामुळे पोल्ट्रीमध्येदिवे लावून उष्णता निर्माण केली जाते.

Updated on 11 July, 2021 4:17 PM IST

जर आपण कोंबड्यांचा विचार केला तर त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या हवामान बदला नुसार समरस होण्याची क्षमता जास्त असते. कोंबड्यांच्या बऱ्याचशा जातींमध्ये काही जाती या वातावरणाच्या अधिक प्रमाणात जुळवून  घेतात तर काही फारच कमी प्रमाणात वातावरणाशी जुळवून घेतात. त्यामुळे वातावरणानुसार कुकूटपालन व्यवसाय कोणत्या प्रकारचे बदल करावेत याबद्दल या लेखात माहिती घेणार आहोत.

 कोंबड्यांना तुलनेमध्ये अधिक  तापमानाची गरज असते. जेव्हा कोंबडी अंडी उबवते त्यावेळी तापमानाचे सरासरी ही 35 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असते. अंडी फुटल्यानंतर पिल्लू ज्या वेळी बाहेर येते ती वेळ आणि त्यानंतरच्या काही तासांपर्यंतबाहेर आलेल्या पिल्लांना 34 अंश सेल्सिअस तापमान लागते.पिल्लांचे वय एक एक आठवड्याने वाढेल तसे उपलब्ध तापमानाचे पातळी 2-2 अंश सेल्सिअस  ने कमी होते.  पिल्लांच्या शरीराचे तापमान 13 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते. याच कारणामुळे  पोल्ट्रीमध्येदिवे लावून उष्णता निर्माण केली जाते.

वातावरणातील तापमान 18 ते 24 अंश सेल्सिअस असते. तेव्हा कोंबड्या उत्साही असतात. कोंबड्यांवर या तापमानाचा कोणताही वाईट परिणाम होत नाही. कोंबड्यांची योग्य वाढ होतेतसेच कोंबड्या निरोगी राहतात. तापमानाच्या संतुलनामुळे कोंबड्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण वाढतेव मरतुकीचे प्रमाण देखील कमी होते.वातावरणातएक अंश सेंटिग्रेड तापमान वाढले तेव्हा प्रत्येक अंश तापमानाला दीड टक्के खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते. पिल्लांची वाढ जशीजशी होत जाते तशी तशी शेडमध्ये दिव्यांची संख्या कमी करावी लागते. थंडीच्या दिवसांमध्ये जास्त थंडी असेल तर उष्णता  निर्माण करण्यासाठी हीटिंग कॉइल वापरली जाते. याद्वारे सूक्ष्म वातावरण  बदल कृत्रिमरीत्या घडवून आणतात. त्यासाठी आपल्याला माहीतच आहे की शेवटचा दरवाजा छोटा आकाराचा ठेवावा लागतो किंवा शेडच्या खिडक्यांना गोणपाटाने झाकावे लागते. हिवाळ्यात शेड मधील वातावरण सुयोग्य ठेवण्यासाठी सापेक्ष आद्रतेचे चा विचार करणे फार महत्त्वाचे आहे. कारण इतर प्राण्यांपेक्षा कुक्कुटपालनास कोरडे हवामान चांगले मानवते. यामुळे शेडमधील सापेक्ष आद्रता 50 ते 60 टक्के असावी.

 मांस, अंड्यांचे उत्पादन दर्जेदार व चांगल्या प्रतीचे होण्यासाठी कोंबड्यांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारचे होणे गरजेचे आहे. चल कृष्ण प्रदेशातील कोंबड्यांचा विचार केला तर त्या कोंबड्यांना फाऊल कॉलरा जास्त प्रमाणात होतो. या रोगाचे जिवाणू 16.6अंश सेल्सिअस तापमानात सलग दोन वर्षे जगतात.या रोगाची लागणझाल्यामुळे 60 टक्‍क्‍यांपर्यंत मरतुकीचे प्रमाण वाढते. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांच्या अतोनात नुकसान होते. या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो. कोंदट ठिकाणी या रोगाची लागण जास्त प्रमाणात होते. कॉकसीडीओसीस हा रोग प्रामुख्याने लिटर( शेडमधील खालील आच्छादन ) मधील ओलसरपणा वाढल्यामुळे होतो. त्यामुळे वेळच्या वेळी गादी हलवणे किंवा बदलणे गरजेचे असते.

 कोंबड्यावर  वाढत्या  तापमानाचा कोणता परिणाम होतो?

  • कोंबड्यांचा श्वसन क्रियेचा वेग वाढतो व कोंबड्या शेडमध्ये थंड जागी जास्त बसलेल्या दिसतात.
  • रक्ती हगवण, आतड्याचा दाह, शरीर पोकळीत पाणीसाठणे, गाऊट यासारख्या आजाराचे प्रमाण वाढते. कोंबड्यांवर ताण आल्यामुळे ज्या ठिकाणी लिटर जास्त असते त्या ठिकाणी ते आडवे पडतात.
  • कोंबड्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण 1 ते 3 पटींनी वाढते.

 

यावर कोणत्या उपाय योजना कराव्यात?

  • कोंबड्यांना नियमित थंड पाण्याचा पुरवठा करावा व पाण्यासोबत प्रतिलिटर पाच ग्रॅम गूळ मिसळावा. त्यामुळे थकवा जाणवणार नाही. तसेच कोंबड्या खूप जास्त प्रमाणात पाणी पितात.
  • खाद्याची भांडी दहा टक्के प्रमाणात वाढवावीत. त्यामुळे कोंबड्यांच्या खाद्य खाण्याचे प्रमाण वाढते.
  • कोंबड्यांना सकाळी नऊ वाजेपर्यंत दुपारी चारच्या नंतर खाद्य मुबलक प्रमाणात द्यावे. त्यामुळे खाद्य खाण्याचे प्रमाण वाढून मरतूक टाळता येते.
  • कोंबड्यांना खाद्य देताना ते अल्फाटॉक्सिन मुक्त द्यावे. तीन ते साडेतीन टक्के कॅल्शिअम खाद्यातून पुरवठा करावे.
  • खाद्यातील पोषणतत्वांची घनता वाढवावी. जेणेकरून कमी खाद्य खाल्ले तरी कोंबड्याची पोषणतत्वांची गरज पूर्ण करता येईल.
  • तसेच दुपारच्या वेळी खाद्यावर थोडे थोडे पाणी शिंपडावे. जेणेकरून कोंबड्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण वाढते.
English Summary: management in poultry farming
Published on: 11 July 2021, 04:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)