Animal Husbandry

सध्या शेळीपालनाचा व्यवसाय अतिशय वेगाने सुरू आहे. शेळीची ही जात मूळ महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूर, तुळजापूर आणि उदगीर तालुक्यांतील आहे. या जातीचे नाव मूळ उस्मानाबादी असे ठेवले आहे.

Updated on 30 October, 2021 4:58 PM IST

सध्या शेळीपालनाचा व्यवसाय अतिशय वेगाने सुरू आहे. शेळीची ही जात मूळ महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूर, तुळजापूर आणि उदगीर तालुक्यांतील आहे. या जातीचे नाव मूळ उस्मानाबादी असे ठेवले आहे. उस्मानाबादी शेळ्या प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर, लातूर, परभणी, उस्मानाबाद, सोलापूर आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये आढळतात. पण आज शेळीची ही जात आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि इतर काही राज्यांमध्ये काहीशां प्रमाणात आढळतात.

उस्मानाबादी शेळी मांस आणि दूध उत्पादनासाठी योग्य असते. पण प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी पाळले जातात, कारण या जातीमध्ये उत्तम दर्जाचे मांस आढळते. उस्मानाबादी शेळीच्या मांसाला त्याच्या दर्जामुळे मोठी मागणी आहे. उस्मानाबादी शेळीच्या चाऱ्यावर आणि देखभाल करण्यास फारसा खर्च येत नाही.

उस्मानाबादी शेळीची वैशिष्ट्ये (Features Of Osmanabadi Goat)

उस्मानाबादी शेळ्या आकाराने मध्यम ते मोठ्या असतात. या प्रकारच्या शेळ्यावर तपकिरी, पांढरे किंवा ठिपके असलेले रंग असतात. या शेळ्याचे पाय लांब पाय असतात, त्यांचे कान मध्यम ते लांब असतात.इतर शेळी जातींप्रमाणेच उस्मानाबादी शेळीचा गर्भधारणा कालावधी ५ महिन्यांचा असतो. सुमारे 4 महिन्यांच्या वेताचा कालावधी असतो शिवाय दररोज सरासरी 0.5 ते 1.5 लिटर दूध देत असतात.

 

उस्मानाबादी शेळी हे कमाईचे उत्तम साधन

शेतकरी बांधव इतर शेळ्यांच्या तुलनेत उस्मानाबादी जातीची शेळी पाळतात, त्यामुळे ती तुमच्यासाठी उत्पन्नाचा स्रोत चांगला बनू शकते. नमूद केल्याप्रमाणे, या जातीच्या शेळ्यांच्या मांस आणि दुधाची मागणी जास्त आहे, त्यामुळे पशुपालकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

English Summary: Make a lot of money by raising goats of Osmanabadi breed, learn the features of Osmanabadi
Published on: 30 October 2021, 04:55 IST