शेळीपालनामध्ये शेळ्यांच्या आहार व्यवस्थापन आला खूपच महत्त्व आहे. शेळीपालनामध्ये जर शेळ्यांची निवड,सगळ्यांचा पैदास कार्यक्रम आणि गोठ्याचे बांधकाम यांच्यासह योग्य प्रकारे व्यवस्थापन केले तर फायदा होऊ शकतो परंतु आहार व्यवस्थापनामध्ये जर निष्काळजीपणा केलात तर पूर्ण व्यवसायाची वाट लागण्याची शक्यता असते.
सर्वांना अगदी कमी खर्चात परंतु गरजेनुसार सकस चारा व पशुखाद्य देणे आवश्यक आहे. जरी शेळीपालन करताना शेळ्यांची निवड केली तसेच जातवान बोकड यांचा कळपामध्ये समावेश केला तरी त्यांचे अनुवंशिक गुणधर्म पक्ष पीत होण्यासह पुढील पिढीत उतरण्याची साठी सुयोग्य आहार व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा आहे.या लेखात आपण शेळ्यांच्या आहार व्यवस्थापन आतील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ.
शेळ्यांच्या आहार व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे…..
- शेळ्यांचे प्रमुख वैशिष्ट्य असे आहे की त्या खाण्याच्या बाबतीत खूपच चंचल आणि चोखंदळ असतात. त्या उपलब्ध चारा मधून निवडून चांगला चारा खातात आणि बिन कामाचा चाऱ्या कडे अजिबात लक्ष देत नाहीत.
- इतर प्राण्यांसारखे शेळ्या एका जागी उभे राहून कधीच खात नाहीत. त्या इकडून तिकडे फिरत आणि खाण्याची मजा घेत सगळ्यांचे पोटभरणे चालू असते.
- त्यामुळे आपण देत असलेला चारा आणि पशुखाद्य यांचा दर्जा चांगला असल्याचे काळजी घ्यावी.
- त्यांच्या सर्वात आवडते खाद्य म्हणजे झाडांचा पाला हाहोय. त्या रानावनात येताना सहजपणे खायला मिळणार यांना सोडून मस्तपैकी झाडांच्या वरील किंवा वेलींच्या वेढ्यात पडलेले लुसलुशीत असे खाद्य आवडीने खातात.
- शेळीचा जार एकूण खाण्याच्या सवयींचा अभ्यास केला तर असे दिसते की, त्या जास्तीत जास्त 30 टक्के भुक गवत खाऊन भागवतात. उलट झाडपाला किंवा रानातील वनस्पती ते आवडीने खातात आणि त्यांची एकूण खाद्याचे प्रमाण 70 टक्क्यांपर्यंत असू शकते.
- शेळ्या हिरवा चारा, वाळलेले गवत किंवा वैरण, पशुखाद्य असे सर्व प्रकारचे अन्न खातात.त्यातील हिरवा व वाळलेला चारा खाल्ल्याने त्यांचे पोट भरून रवंथ करण्याची क्रिया सुरळीत होते. तसेच याद्वारे त्यांना क्षार आणि जीवनसत्त्वे मिळतात.
- शेळीचे वजन 30 किलो पकडले तर त्यामध्ये तिला तीन किलो हिरवा चारा, अर्धा किलो पेक्षा जास्त वाळलेला चारा आणि पाव किलो खुराक अशा पद्धतीने चारा व्यवस्थापन करावे. शेळीच्या वजनाच्या प्रमाणानुसार त्यात आवश्यक ते बदल करावेत.
- प्रजननाचा हंगाम आणि गर्भधारणा झाल्यावर अखेरच्या दोन महिन्यात शेळ्यांना आणखी जास्त पशुखाद्य द्यावे. म्हणजे अशा वेळी 400 ते 500 ग्रॅम इतके पशुखाद्य दिल्यास अनुक्रमें जुळ्या करडांचे प्रमाण वाढण्यासह पोटातील गर्भात असलेल्या करडांचे वजन वाढण्यास मदत होते.
- शेळांच्या दुधामध्ये प्रथिन असते तसे त्यांनाही शरीराच्या वाढीसाठी आणि निरोगी राहण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांना आहारात सरासरी 17 टक्के पचनीय कच्चे प्रथिन व सुमारे 65 टक्के प्रमाणातील पचनीय पदार्थ देण्याची काळजी घ्यावी. ( संदर्भ- कृषी रंग)
Published on: 26 December 2021, 06:34 IST