Animal Husbandry

कोल्हापूर जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने पशुपालक चिंतेत पडले आहेत. लम्पीच्या आजारामुळे शेतकऱ्यांच्या देखत जनावरांचा मृत्यू होऊ लागला आहे. यामुळे पशुपालक मोठा आर्थिक फटका बसत आहे.

Updated on 01 September, 2023 10:00 AM IST

कोल्हापूर

राज्यात पु्न्हा एकदा लम्पी संसर्गजन्य आजाराने डोकेवर काढले आहे. त्यामुळे पशुपालकांची चिंता अधिक वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, गारगोटी, भुदरगड आणि कागल तालुक्यात लम्पीने हाहाकार माजवला आहे. ॉ

कोल्हापूर जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने पशुपालक चिंतेत पडले आहेत. लम्पीच्या आजारामुळे शेतकऱ्यांच्या देखत जनावरांचा मृत्यू होऊ लागला आहे. यामुळे पशुपालक मोठा आर्थिक फटका बसत आहे.

जिल्ह्यातील पशुपालकांकडून जिल्हा पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांवर आणि गोकुळ दूध संघाच्या अधिकाऱ्यांवर उपाययोजना न केल्याचा आरोप केला जात आहे. तसंच जनावरांना उपचार करूनही फरक पडत नाही. परंतु शासनाकडून पुरेशी मदत मिळत नसल्याची तक्रार काही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, गाई, बैल आणि कालवडी यांना लम्पी संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे.  डिसेंबर २०२२ मध्ये आलेल्या या आजारात सुमारे २०० जनावरे दगावली होती. काही दिवस या आजाराचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र आता पुन्हा आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे पशुपालक, व्यापारी यांची चिंता वाढली आहे.

English Summary: Lumpy's havoc in four talukas of Kolhapur district
Published on: 05 August 2023, 03:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)