lumpy-skin-disease: शेतकऱ्यांसमोरील संकटाची मालिका सुरूच आहे. देशात लम्पी (Lumpy) आजाराने धुमाकूळ घातला आहे. लम्पीमुळे देशात आतापर्यंत एकूण 82 हजार जनावरांचा (cattle) मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूचा आकडा वाढला आहे. राज्यात आतापर्यंत 187 जनावरे या आजाराचे बळी गेले आहेत.
लम्पीला रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच देशभरात लम्पीच्या (lumpy-skin-disease) लसीकरणाला देखील वेग येत आहे.
लम्पी या आजारामुळे अचानक गुरे दगावत असल्याने याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
Petrol-Diesel Price: देशात पेट्रोल-डिझेल 12 रुपयांनी स्वस्त होणार!
लंपी व्हायरसवर उपाय
१. लंपीची लागण झालेल्या जनानरांना वेगळे ठेवा.
२. माश्या, डास, गोचीड यांना मारून टाका.
३. जनावराचा मृत्यु झाल्यास मृतदेह मोकळ्या जागेवर नसोडता पुरून टाकावा किवा जाळून टाकावा.
४. संपुर्ण गोठ्यात कीटकनाशक फैरावे.
शेतकऱ्यांनो अशी घ्या काळजी
रोगाची लक्षणे आढळण्यात जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना संपर्क करावा तसेच टोल फ्री क्रमांक 180023301 किंवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशु सेवेचा टोल फ्री क्रमांक 1962 यावर तात्काळ संपर्क साधावा.
अखेर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला..
काय असतात लक्षणे (Lampi Virus Syptomps)
* जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते व ताप येतो.
* डोळ्यातून व नाकातून पाणी येते.
* लसिका ग्रंथींना सूज येते.
* दूध उत्पादन कमी होते चारा खाणे पाणी पिणे कमी होते.
* पोट, मानेवर, कास, डोके या भागातील त्वचेवर दहा ते पंधरा एम एम व्यासाच्या गाठी येतात.
Published on: 19 September 2022, 10:32 IST