Animal Husbandry

सध्या कोरोनाची भीती लोकांच्या मनात असतानाच आणखी एक विषाणू वेगाने पसरत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात आणखी भीती निर्माण होत आहे. असे असतानाच लम्पी स्किन डिसीज (lumpy skin Disease) नावाच्या या आजारामुळे गाई-म्हशी मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत.

Updated on 26 July, 2022 5:30 PM IST

सध्या कोरोनाची भीती लोकांच्या मनात असतानाच आणखी एक विषाणू वेगाने पसरत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात आणखी भीती निर्माण होत आहे. असे असतानाच लम्पी स्किन डिसीज (lumpy skin Disease) नावाच्या या आजारामुळे गाई-म्हशी मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत.

लम्पी स्किन डिसीज या आजारामुळे दुभत्या जनावरांवर (Dairy animals) सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत या विषाणूमुळे शेकडो जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या पशुपालकांना दुभत्या जनावरांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

हे ही वाचा 
Eknath Shinde: चक्क एकनाथ शिंदेंनीच केला मोदींचा निर्णय रद्द; आवास योजनेला दिली स्थगिती

लक्षणे

जनावरांना खूप ताप येतो, त्यांच्यामध्ये उष्णता जाणवते डोके आणि मानेच्या भागात खूप वेदना होतात.

हा आजार झाल्यास जनावरांची दूध देण्याची क्षमताही कमी होते.

आतापर्यंत हजारो जनावरांमध्ये हा रोग आढळून आला आहे. तर 999 जनावरे दगावली आहेत.

तसेच, 37 हजारांहून अधिक संक्रमित जनावरांवर उपचार सुरू आहेत. याचा परिणाम शेतीला (Agriculture) जोडधंदा असलेल्या पशुपालन व्यवसायावर होत आहे. ही सर्व माहिती भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, बरेलीचे पशु रोग संशोधन आणि निदान केंद्राचे सहसंचालक यांनी दिली आहे.

हे ही वाचा 
Farmer Scheme: शेतकऱ्यांसाठी मनसे मैदानात, केली मोठी घोषणा..

अशी काळजी घ्या

मुख्यता हा विषाणू डास आणि माश्या यांसारख्या रक्त शोषणाऱ्या कीटकांमुळे पसरतो. दूषित पाणी, लाळ आणि खाद्य यांमुळे जनावरांना हा आजार होतो. जेव्हा जेव्हा जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे दिसतात तेव्हा सर्वप्रथम तुमच्या आजारी गायी आणि म्हशींना वेगळे करा.

त्यांच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्थाही वेगळी करा. जनावरे ठेवलेल्या ठिकाणी स्वच्छता ठेवा. असे न केल्यास आपल्या इतर प्राण्यांना या आजाराने ग्रासून जनावरांचा जीव जावू शकतो. त्यामुळे वेळेत काळजी घ्या.

महत्वाच्या बातम्या 
२१०० किलो मटन, तेवढेच चिकण, १२०० किलोचे मासे, १३ हजार अंडी, भाजप आमदाराची आखाड पार्टी जोरात..
Rice farming: भारीच की; शेतकऱ्यांना भात लागवड यंत्रावर मिळतंय 50 टक्के अनुदान; करा आजच अर्ज
Rice farming: अरे व्वा; आता भात लागवड होणार आणखी सोप्पी, यंत्रामुळे शेतकऱ्यांना दिलासा

English Summary: Lumpy skin disease spreading rapidly among animals
Published on: 26 July 2022, 05:20 IST