गेल्या काही दिवसांपासून लम्पीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे पशुपालकांच्या चिंतेत भर पडली आहे. शेतकरी यामुळे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडेत येथे या आजाराने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे.
यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. याठिकाणी आजाराने चार जनावरांचा बळी घेतला आहे. पुन्हा लम्पीचा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क झाले असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण, औषध फवारणी केली जात आहे.
यामुळे प्रशासन देखील सावध झाले आहे. यामुळे आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव वाढला होता. अनेक जनावरांना हा आजार जडला होता.
भारतातील या राज्यात सर्वाधिक महाग टोमॅटो विकला जातोय, तोडले सगळे रेकॉर्ड..
त्यामुळे पशुपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. जनवारांच्या गोठ्यातील माशी, गोमाशी आणि घाणीमुळे या आजाराची लागण होते. हा आजार काही प्रमाणात आटोक्यात आला होता.
आता मात्र पुन्हा एकदा त्याने डोकं वर काढले आहे. येथील कागल, भुदरगड आणि करवीर तालुक्यातील जवळपास 40 ते 50 जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी जनावरे खरेदी-विक्री करू नये, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाकडून केले आहे.
लवंगाची शेती आहे खूपच फायदेशीर, जाणून घ्या..
परंतु यामुळे पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान यामुळे होत आहे. यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याठिकाणी लसीकरणावर भर दिला जात आहे.
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे बारामतीतील कृषी संशोधन पाहून भारावले, म्हणाले, देशात आदर्श म्हणजे बारामती..
तेरणा इंजीनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळणार धेनू ॲपद्वारे डिजिटल उद्योमीता प्रशिक्षण...
महाराष्ट्रातील वीजदर इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक, दर कमी करण्यासाठी जनहित याचिका दाखल..
Published on: 31 July 2023, 03:48 IST