Animal Husbandry

देशासह राज्यात सध्या लंम्पी रोगाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे यावर उपाय योजना करण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. जनावरांसाठी हा रोग जीवघेणा ठरत आहे. मात्र प्रशासकीय नियोजन दिसून येत नाही. यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत.

Updated on 26 September, 2022 12:18 PM IST

देशासह राज्यात सध्या लंम्पी रोगाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे यावर उपाय योजना करण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. जनावरांसाठी हा रोग जीवघेणा ठरत आहे. मात्र प्रशासकीय नियोजन दिसून येत नाही. यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत.

यामुळे राजू शेट्टी व भाई संपतराव पवार तसेच मलकापूर तालुक्यातील भालेगावचे सरपंच तेजस विलासराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख यांनी मिळून शेतकऱ्यांचे व्यापक जनहित लक्षात घेऊन अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. तृणाल टोणपे, अ‍ॅड. अजित देशपांडे, अ‍ॅड. अजिंक्य उडाणे, अ‍ॅड. अक्षय देसाई यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या रोगामुळे मोठया प्रमाणात गायी, म्हशी आणि दुध देणारी जनावरे मरत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या मोठे नुकसान होते आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. राजस्थान, गुजरातध्ये मोठ्या प्रमाणावर याची तीव्रता आहे. महाराष्ट्रात देखील आता याचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

वीज बिल निम्म्याहून कमी येणार! फक्त 275 रुपयांचे हे उपकरण वीज मीटरजवळ ठेवा

दरम्यान, या याचिकेत राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास मत्स्य व्यवसाय विभाग, पशु संवर्धन आयुक्तालय, भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था पुणे, महाराष्ट्र राज्य पशु वैद्यकीय परिषद, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे, महाराष्ट्र सरकार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरते बाबतचाही प्रश्न या जनहित याचिकेतून मांडण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांनो खेकडा पालन आहे उत्तम व्यवसाय, कमी खर्चात मिळतोय लाखोंचा नफा

जत्रा आणि वाहतूक या सगळ्यांवर जरी बंदी घातली असली तरी सरकारने उपचाराच्या दृष्टीने कुठलेही विशिष्ठ निर्णय घेतलेले नाहीत. वैद्यकीय प्रशिकक्षित सगळ्यांचा तातडीच्या गोसेवेसाठी वापर करणे संयुक्तिक ठरणार आहे. परंतु असा कोणताच विचार करतांना सरकार दिसत नाही, असेही यामध्ये म्हटले गेले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
झेंडूचा भाव 70 रुपये किलोपर्यंत, नवरात्रीपूर्वीच फुलांची मागणी वाढली, शेतकरी समाधानी
Tractor Subsidy Scheme: सरकार देतंय ट्रॅक्टर खरेदीवर 50% अनुदान, असा करा अर्ज
Farmar protest: शेतकरी संप सुरूच, कृषिमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

English Summary: Lumpy disease High Court, Raju Shetty filed PIL Bombay High Court
Published on: 26 September 2022, 12:18 IST