Animal Husbandry

भूक मंदावणे– चाराही समोर असताना न खाणे. पाण्याचे सेवन कमी होणे– तहान असूनही पाणी न पिणे. दुधउत्पादन घटणे– गाई/म्हशींमध्ये अचानक दूध कमी होणे.

Updated on 16 July, 2025 2:02 PM IST

- भूक मंदावणे– चाराही समोर असताना न खाणे.

- पाण्याचे सेवन कमी होणे– तहान असूनही पाणी न पिणे.

- दुधउत्पादन घटणे– गाई/म्हशींमध्ये अचानक दूध कमी होणे.

- वारंवार श्वास घेणे– शांत असतानाही श्वास लागल्यासारखा आवाज.

- हृदयगती वाढलेली– छातीचा धडधडाट जास्त जाणवतो.

- डोळे कोमेजलेले किंवा पाणावलेले– ताणाचे संकेत.

- कान मागे व शेपूट दाबून ठेवणे– अस्वस्थतेचं लक्षण.

- सतत बसून राहणे– उभं राहायला नाखूष असणे.

- अचानक वजन घटणे– खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्यामुळे.

- कातडी कोरडी होणे व केस गळणे– पोषण कमी घेतल्याचे संकेत.

- लाळ जास्त येणे- तोंडातून गळती.

- रागीट किंवा घाबरट वागणे– इतर जनावरांना टाळणे.

- पोट फुगणे किंवा गॅसेस होणे- पचन बिघडल्याचे चिन्ह.

- डोळ्यांत लालसरपणा- ताणामुळे रक्ताभिसरण बदलतो.

- सतत गरगर फिरणे किंवा जमिनीवर पाय आपटणे – बेचैनी.

- घाम येणे (गाय, म्हैस)- विशेषतः उष्ण हवामानात.

- लंगडणे किंवा हालचाली मंदावणे– शारीरिक अशक्तपणा.

- रोजच्या कामगिरीत बदल– दूध देताना किंवा जोखताना विरोध करणे.

- सामाजिक वर्तन बदलणे– गटापासून दूर राहणे.

- अत्यंत शांत किंवा उलट आक्रमक होणे– मनोवैज्ञानिक ताणाचा परिणाम.

स्ट्रेस ओळखून वेळेत उपचार केल्यास जनावरांचे आरोग्य व उत्पादन दोन्हीही सुधारते.

लेखक- नितीन रा. पिसाळ

पशुसंवर्धन सल्लागार व कृषी अभ्यासक

फार्मर द जर्नलिस्ट- कृषी जागरण (राष्ट्रीय कृषी मीडिया)

English Summary: “Low milk? No appetite? These 20 signs tell the owner!! Your animal is in STRESS”
Published on: 16 July 2025, 02:02 IST