अस्मानी संकटांचा विचार करता शेतकऱ्यांना फक्त शेतीवर अवलंबून न राहता पशुपालन करून दुग्ध व्यवसाय करणे ही गरज झाली आहे. मात्र, त्यावर देखील संकटांची मालिका उभी राहू पहात आहे. काल १२५ वर्षातील सर्वधातिक तापमानाची नोंद झाल्याची बातमी वाऱ्या सारखी राज्यात पसरली. त्यात विदर्भात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे तापमान कमी होत नसून उन्हाचा तडाखा दिवसागणिक वाढतच आहे.
परिणामी दुग्ध व्यवसाय संकटात सापडला असून शेतकऱ्यांचे पशुधन देखील अडचणीत आले आहे. राज्यात लाखो लिटर दूध संकलन घाटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पावसाळा आणि हिवाळ्यात सर्वत्र चारा उपलब्ध होत असल्याने दूध संकलन मोठ्या प्रमाणात संकलित होते. मात्र, मार्च महिन्यापासून दूध संकलनात घट सुरु असून एप्रिलमध्ये देखील प्रतिकूल परिणाम पहायला मिळाला. तर आणखी दिड ते दोन महिने पावसाला अवकाश असल्याने येत्या काही दिवसात संकलनात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दूध कमी पडल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर होत असून जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना जिकिरीचे झाले आहे. पुरेसे दूध आणि अधिक दर मिळला तरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवता येणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. दुभत्या जनावरांवरील खर्च वाढत चालला असून सोबत भाकड जनावरे देखील शेतकऱ्याला सांभाळावी लागतात. त्यामुळे या परिस्थितीचा विचार करून सरकारने अनुदान देण्याची मागणी केली जात आहे. उन्हाळ्यात जनावरांच्या निवाऱ्याची चांगली व्यवस्था करून त्यांना सावलीत बांधणे आवश्यक आहे.
शिवाय जनावरांना वेळच्यावेळी पाणी पाजणे जनावरांच्या अंगावर पाणी शिंपडणे. वाढत्या तापमानाने माणसांसारखा जनावरांच्या पोटात सोक पडतो. अशात सुक्या चाऱ्याऐवजी ओला चारा जनावरांना आवश्यक असतो. पाणी पाजण्याच्या वेळाही वाढवाव्यात. उन्हाळ्यात जनावरांना नेमका कोणता चारा देण्याची गरज आहे, याबाबत माहिती घेत राहणे आवश्यक असून पशुधन जोपासण्यास या बाबी आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
यंदा उन्हाळा तीव्र असून वाढत्या तापमानामुळे जनावरांचा ताण कमी करण्यासाठी व्हिटॅमिन ए, डि, सी जनावरांना देणे आवश्यक आहे. जनावरांचा गोठा शक्यतो सावलीला असावा किंवा त्यात थंडावा निर्माण होईल असे नियोजन करणे आवश्यक आहे. उन्हाळी आजारांपासून जनावरांना दूर ठेवण्यासाठी स्वच्छ आणि पुरेसे पाणी देणे आवश्यक असल्याचे पशुसंवर्धन विभागा तर्फे सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या;
गाय आणि म्हशीच्या कानातील 'आधार कार्ड' टॅगमुळे शेतकऱ्यांचा फायदा! मिळतो 'या' योजनांचा फायदा..
टाटा मोटर्स करणार धमाका! 'या' दिवशी करणार 400 किमी रेंज असलेली स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च..
तरुणांनो संधीच सोनं करा! ICMR मध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा कर्ज..
Published on: 30 April 2022, 05:48 IST