Animal Husbandry

हिरवा चारा विशिष्ट कालावधीतच घेता येत असल्याने तो बाराही महिने उपलब्ध नसतो.

Updated on 25 January, 2022 7:08 PM IST

हिरवा चारा विशिष्ट कालावधीतच घेता येत असल्याने तो बाराही महिने उपलब्ध नसतो. त्यामुळे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याची लागवड केल्यास एक विशिष्ट प्रक्रिया करुन हा चारा साठवून ठेवता येतो. मुरघास शास्त्रशुध्द पध्दतीने साठवला तर बाराही महिने गुरांसाठी पौष्टिक चारा उपलब्ध करता येतो.

मुरघासचे फायदे

हिरवा चारा नसेल अशा टंचाईचा काळात मुरघास हिरवा चारा म्हणून खाऊ घालता येतो. जास्तीच्या चाऱ्याची विल्हेवाट चांगल्या प्रतिचा चारा तयार करण्यासाठी करता येते. कमी जागेत जास्त चारा साठविता येतो. चारा उपलब्ध असल्यास मुरघास केणत्याही हंगामात बनविता येते. उन्हाळ्यात मूरघास खाऊ घालून दुभत्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता टिकवून ठेवता येते. शिवाय जनावरांचे आरोग्य नीट राखण्यास मदत होते.

असा असतो मुरघास

हिरवा चारा योग्य वेळी कापुन तो बंदिस्त खड्ड्यात हवाबंद स्थितीत दोन महिन्यापर्यंत ठेवला जातो. या दरम्यान साठवून ठेवलेल्या चाऱ्यात उपयुक्त अशा रासायनिक प्रकिया घडून येतात आवश्यक असणारी चारा आंबविलेल्या चाऱ्यातील पोषणमुल्यामध्ये काहीही घट न होता चारा स्वादिष्ट आणि चवदार बनतो यालाच मुरघास असे म्हणतात. त्या त्या ठिकाणची परिस्थिती, हवामान व जनावरांची संख्या या गोष्टींवर खड्ड्याची रचना, आकार आणि बांधणी अवलंबून असते. कठीण, पाण्याचा निचरा होणाऱ्या टणक, उंचावरील जागेत खडडा घ्यावा लागणार आहे. खड्ड्यांच्या भिंती सरळ, गुळगुळीत आणि शक्य असेल तर आतुन सिमेंट प्लॅस्टर केल्यास मजबुत होते. खड्ड्याची उंची रुंदीपेक्षा जास्त असावी.

खड्डा भरण्याची पद्धत

बंदिस्त खड्ड्यामध्ये प्राणवायू विरहीत वातावरणात वाढू शकणाऱ्या सुक्ष्म जंतुची वाढ मोठ्या प्रमाणात होते. हे जिवाणू पिकातील शर्करा व पिष्टमय पदार्थ यावर प्रक्रिया करून त्यांच्या विघटनातून प्रक्रिया लॅक्टिन आम्ल तयार करतात. साधारणत: दोन महिन्यात आंबवण्याची प्रक्रिया पूर्ण होते. ह्या अवस्थेत मुरघास तयार झाले असे म्हणतात. दोन महिन्यानंतर खड्डा एका बाजुने उघडून आतील दूषित वायु बाहेर जाऊ द्यावा. त्यानंतरच चारा म्हणून मुरघासचा वापर करता येणार आहे.

मुरघासासाठी चारा फुलोऱ्यात असतानाचं कापणी करावी. कापणीनंतर चारा दिवसभर शेतात सुकू द्यावा. कारण मुरघास तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चाऱ्यामध्ये साधारणतः 60 टक्के ओलावा लागतो. 

चारा सुकल्यावर कटरच्या साहयाने त्याचे 1/2 ते 1 इंचापर्यंत बारीक तुकडे करावेत. मूरघासची पौष्टिकता वाढविण्यासाठी 2 टक्के युरीयाचे द्रावण करून प्रत्येक थरावर फवारावे. खड्डा पुर्णपणे भरल्यावर तो हवाबंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यावर दाब देवून साधारणः 2 ते 3 फुट पालापाचोळ्याच्या थर द्यावा व त्यावर 6 इंचाचा शेणमातीचा लेप देवून खड्डा पूर्णपणे हवाबंद करावा.

English Summary: Learn the benefits of silage, method, important role of silage in animal husbandry
Published on: 25 January 2022, 07:07 IST