जंत हा प्रकार तुम्हाला माहीतच असेल. जे की जनावरांना जंत जास्त प्रमाणत झालेले दिसून येतात आणि त्यामध्ये सर्वात जास्त म्हणले तर वासरू. वासरांमध्ये जास्तीत जास्त जंत झालेला प्रकार समोर आलेला आहे. जंत हे परजीवी असतात. परजीवी म्हणजेच ते सुद्धा त्यांच्या पोषणासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतात. जंत हे जनावरांच्या शरीरात जाऊन त्यांच्यामधील जे पोषक घटक आहेत त्या पोषक घटकांचे जंत शोषण करत असतात. जे की यामुळे जनावरांच्या शरीरात जाऊन जंत राहतात आणि जनावरांना जंतांची बाधा होते.
जंत प्रसार कसा होतो :-
१. जी जनावरे जंताने बाधित झाली आहेत त्या जनावरांच्या शेणातून जंत जमिनीवर पडत असतात.
२. मात्र जी निरोगी जनावरे आहे जसे की त्यांना कोणतेही जंतांची बाधा नाही असे जनावरे त्या ठिकाणी चारा खाण्यास गेले तर ते जंत या निरोगी जनावरांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात.
३. एकदा की जंत जनावरांच्या शरीरात प्रवेश करताच ती लगेच जनावरांच्या आतड्यामध्ये जाऊन बसतात. .
४. तर काही वेळेस जनावरांच्या शेणातून जंत जमिनीवर आले की त्यांना जर तिथे पोषक वातावरण भेटले तर ते जंत तेथील गवताच्या पानांवर जाऊन बसतात.
५. जेव्हा आपण जनावरे चारा खाण्यासाठी शेतामध्ये सोडतो त्यावेळी जनावरांनी ते गवत खाल्यानंतर ते जंत खान्यावाटे आत जाऊन जंत बाधा होते.
६. जर जतांना पोषक वातावरण भेटले नाही तर ते स्वतः पोषक वातावरण तयार करून जवळपास ३ महिने जगतात.
जंत बाधा कशी ओळखावी :-
एकदा की जंतांनी जनावरांच्या शरीरात प्रवेश केला की ते जंत जनावरांच्या शरीरातील पोषक घट जसे की त्यांच्या पोटातील पाचक स्त्राव, अन्न तसेच रक्त या गोष्टींवर जगत असतात. जनावरांना जंत बाधा झाली की जनावरांचे शेण पातळ पडण्यास सुरू होते तसेच जनावरांची जी त्वचा आहे ती कृश, जाड पडायला सुरू होते आणि ती दिसून सुद्धा येते. त्यांच्या शरीरावरील जी कातडी आहे त्यावरील चमक सुद्धा दिसत नाही. तर मेंढ्याना जंत बाधा झाली तर त्यांच्यामध्ये असणारी जी लोकर आहे त्याची प्रत खालावते आणि दुधाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होयला सुरुवात होते.
जंतनिर्मूलन करण्यासाठी काय करावे :-
जंतनिर्मूलन करण्यासाठी बाजारामध्ये विविध प्रकारची औषधे देखील उपलब्ध आहेत. जी नवीन वासरे आहेत त्यांना दहाव्या दिवशी जंतांचा डोस दिला जातो तर पुढील सहा महिन्याला प्रति महिनात एक जंतांचे औषध दिले जाते. तर जी मोठी जनावरे आहेत त्या जनावरांना प्रति तीन महिन्यातून जंतांचे औषध द्यावे. शेवटी जनावरांच्या शेणाची तपासणी करून जंतनिर्मूलन होतेय की नाही हे देखील तपासावे.
Published on: 15 April 2022, 01:00 IST