सध्या राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. थंडी मुळे आपण जशी आपल्या आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेतो तश्या प्रकारे आपल्याला आपल्या गुरांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे.डिसेंबर च्या पाहिल्या आठवड्यापासून पडत असलेला अवकाळी पाऊस आणि बदलते हवामान यामुळे अनेक जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच वाढती थंडी जनावरांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरत आहे.तसेच थंडीचा सर्वात मोठा परिणाम हा दुधाळ गुरांवर होत आहे.
थंडीमध्ये योग्य निवारा:-
थंडीच्या दिवसात गुरांना योग्य निवारा असणे गरजेचे आहे. थंडीच्या दिवसात जनावरांचे गोठे हे गवताने किंवा काडाने शाखरावे. त्यामुळे थंडीपासून जनावरांचे रक्षण होईल. तसेच थंडीच्या दिवसात भरपुर सूर्यप्रकाश गुरांना द्यावा. यामुळे जनावरे तंदुरुस्त राहतात तसेच आजारी पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते.
जंतू निर्मुलन वेळेकर करणे गरजेचे:-
थंडी च्या दिवसांमध्ये गुरांच्या नाकातून आणि डोळ्यांतून पाणी येणे तसेच भूक कमी होणे, जनावरे थरथर कापणे अश्या प्रकारची लक्षणे आपल्याला दिसतात. थंडीच्या दिवसात जनावरांच्या गोठ्यात कोरडे वातावरण ठेवावे. तसेच गोठ्यामध्ये स्वच्छता करावी.तसेच जंतुनाशके गोठ्यात फवरावी आणि गोठ्याची स्वच्छता करावी, जेणेकरून जनावरे आजारी पडणार नाहीत. तसेच जनावरांना स्वच्छ पाणी आणि सुका चारा द्यावा. ओल्या चाऱ्याचे प्रमाण कमीच ठेवावे.
लसीकरण महत्वाचे:-
जनावरांचे आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी जनावरांना स्क्रॅपिंग, गळा दाबणे, लंगडी, चेचक या प्रकारची लसीकरने करून घ्यावीत. तसेच थंडीच्या दिवसात वासरांना खोकला, न्यूमोनिया, खोकल्याशी संबंधित आजार असल्यास पशुवैद्यांचा सल्ला घेऊनच जनावराला औषध द्या. तसेच दुभत्या जनावरांना या आजारापासून वाचवण्यासाठी दूध काढल्यावर त्यांच्या कास जंतुनाशकाने धुवावी आणि स्वच्छ करावी.
योग्य प्रमाणात हिरवा चारा:-
थंडीच्या दिवसात प्राण्यांच्या आहारात खनिज आणि क्षारांचे विहित प्रमाण असणे गरजेचे आहे. यासाठी जनावरांना सारखा हिरवा चारा द्यावा. तसेच त्या सोबत तृतीयांश कोरडा चारा सुद्धा देणे गरजेचे आहे.
थंडी धोकादायक:-
थंडी ही जनावरांसाठी खूपच बधिकारक ठरत आहे बरीच जनावरे आजारी पडत आहेत तसेच वेगवेगळ्या आजारांची लागण होत आहे. शेळ्या मेंढ्या तर मरत आहेत त्यामुळे थंडीपासून जनावरांचे रक्षण करणे गरजेचेच आहे.
Published on: 14 December 2021, 11:16 IST