आपल्या सर्वांना कुक्कुटपालन, पोल्ट्री माहिती आहे, गिनी फाऊलचे पालनविषयीची माहिती आहे का?. कोंबड्याप्रमाणेच गिनीया फाऊल हे मांस आणि अंड्यासाठी उपयोगी आहे. देशातील बऱ्याच भागात गिनीया फाऊलचे पालन केले जाते. विशेष म्हणजे यासाठी खर्च फार कमी लागतो. ज्या शेतकऱ्यांकडे शेतजमीन कमी आहे, त्यांच्यासाठी गिनीय फाऊल हे खूप फायदेशीर आहे. यामुळे याला लो इन्वेस्टमेंट बर्ड म्हटले जाते. यासाठी कोणताच खर्च येत नाही किंवा औषधांवर इतर अतिरिक्त खर्चही होत नाही.
गिनी फाऊलच्या निवारासाठी मोठं शेड बनविण्याची गरज नसते. इतकेच काय या पक्ष्यांवर कोणत्याच हवामानाचा परिमाण होत नाही. गिनिया फाऊलचं पालन करणं हे बऱ्याच कुटुंबासाठी एक मनोरंजनत्मक आणि साहसी असतं. गिनिआ फाऊल पालन हे आपल्या मालमत्ते भर घालणारा पक्षी आहे. जर तुमच्याकडे बदक किंवा कोंबड्या असतील तर त्या कळपात गिनिआ फाऊल एक वेगळं
आकर्षण आणेल. जर तुम्ही एखादे गिनिआ फाऊलचे लहान पक्षी पाळत असाल किंवा वाढते गिनिआ फाऊल तुमच्याकडे असेल तर त्यांच्या निरोगी आणि मजबुतीसाठी उत्तम प्रतीचा आहार त्यांना देणं आवश्यक असतं. अनेकजण चौकशी करतात की, आम्हाला गिनिआ फाऊलचं पालन करायचं आहे. पण गिनिआ फाऊल तृणधान्य खातात का ? त्यांच्यासाठीच हा लेख आहे. गिनिआ फाऊलचं पालन तुम्ही करत असाल तर त्यांना कशाप्रकारे आहार दिला गेला पाहिजे, याची माहिती आपण यातून घेणार आहोत.
नक्कीच गिनिआ फाऊल हे तृणधान्याला आवडीने खाते, पण जर आपण गिनिआ फाऊलचं पालन करत असाल तर गिनिआ फाऊल या पक्ष्याला योग्य संतुलित, पौष्टीक आहार मिळतोय का याची सुनिश्चितता केली पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या पक्ष्याला मोठं करत असतो तेव्हा आपल्याला आधीच माहिती असावी लागते कि पक्ष्याला काय, कधी कसा आहार द्यावा. गिनिआ फाऊलचे वाढत्या वयात किंवा लहान असतात तेव्हा हे पक्षी खूप नाजूक असतात, त्यांना योग्य आहार मिळणं खूप आवश्यक असते. दरम्यान आज आम्ही आपल्याला गिनिया फाऊल पक्ष्याला 9 प्रकारे पौष्टीक आहार देऊ शकतो, याची माहिती देणार आहोत.
गिनिआ पक्षी सर्वभक्षी पक्षी आहेत Guinea Fowl Are Omnivorous Birds
गिनिआ फाऊल हे वनस्पती आणि प्राणीदेखील खाईल हे पाहिलं पाहिजे. गिनिआ फाऊल हे कीटक, कीडे खातात शिवाय ते काढून ठेवलेल्या तणातून काही बी मिळतं का हे पाहण्यात वेळ घालवतात. गिनी पक्षी गोगल गाय किंवा बेडूक देखील खाऊ शकते, त्याचवेळी ते शेतातील दाणे आणि धान्य खाण्यास पसंत करतील. यामुळे शेता जमिनीकडे गिनी फाऊल पक्षी का आकर्षित होत असतात. कारण शेतात त्यांना मिश्र पद्धतीचे अन्न मिळत असते.
Healthy Snacks Guinea Fowl Love निरोगी स्नॅक्स गिनी फाउलचं आवडतं
लोक अनेक कारणांसाठी गिनी फाऊल वाढवत असतात. पण सर्वात लोकप्रिय कारण म्हणजे गिनिया पक्षी नैसर्गिक कीटकांचा नायनाट करण्यासाठी उत्तम स्रोत आहे. जर तुमच्या बागेत वाळवी, आणि इतर कीटकाचा वावर असेल तर गिनी फाऊल पक्षी त्यांचा शोध घेऊन त्याला भक्ष करेल. इतकेच काय आपल्या बागेत काही विचित्र प्राणी आला असेल किंवा कोणी अनओळखी व्यक्ती आला असेल तर गिनी पक्षी पालकांसाठी आपल्यासाठी मह्त्वाचं काम करतो.
बागेत किंवा घराच्या अंगणात लहा मुले खेळत असतील काही प्राणी आल्यानंतर आपल्याला त्यांची कल्पना व्हावी,यासाठी तुम्ही काही गजर शोधत असाल तर गिनी पक्षी त्यासाठी उत्तम आहे कारण गिनी फाऊल काही विचित्र प्राणी दिसल्यास एक वेगळा आवाज करत असते. एक गोष्ट लक्षात घ्या गिनी पक्षी वन्य प्राणी प्रमाणे आहेत, ते कोंबड्याप्रमाणे नाहीत. तुम्ही त्यांना चरण्यासाठी सोडलं असेल आणि ते लांब पर्यंत गेले असतील तर रात्री त्यांना परत खुराड्यापर्यत आणणं सोपं काम नाही. त्यामुळे त्यांना खुराड्याकडे आणण्यासाठी सांयकाळी चांगले आहार देण्याची सवय लावून ठेवा.
1. Bird Feed
बर्ड फीडगिनी पक्षी हे प्राणी आहेत, त्यांना महागडी फळे देण्याची गरज नाही. बर्ड फीड हे गिनी पक्षीला आहार म्हणून देऊ शकतो. बर्ड फीड हे ऑनलाईन किंवा एखाद्या पक्ष्यांच्या दुकानात मिळू शकते. नाहीतर कोंबड्यांना आणि बदकांना पण जे खाद्य देत असतो ते आपण त्यांना दिलं तरी ते चांगल्याप्ररकारे खातील.
Mealworm कीडे
तुम्ही कोंबड्या पाळत असाल तर तुम्हाला माहिती असंल पाहिजे की, कोंबड्या कीडे किंवा कीटक खाण्यास किती उत्साहित असतात. गिनी फाऊल पक्षीही कीडे खाण्यास पसंती देतात मग ते जिंवत असो किंवा मेलेले.
Rice
आपल्या घरात तांदुळ असेल आणि तो जुना असेल तर तो फेकून न देता गिनी फाऊलला अन्न म्हणून द्या. गिनी पक्षी आवडीने खाईल.
Watermelon
गिनी पक्ष्यांना टरबूज खाऊ घालणे हे खूप चांगले आहे. यातून तुम्ही गिनी पक्ष्यांना जवळून खाद्य देऊ शकतात. टरबूज हे खाद्य म्हणून परवडणारे फळ आहे, आपल्याकडील पक्ष्यांची संख्येनुसार आपण त्याची खरेदी करू शकतो.
Meat
शिवजलेले कोंबडीचे मांस इतर पक्ष्यांना देणं तसं वेगळंचं वाटत पण हे पक्षी सर्वभक्षी आहेत. त्यामुळे गिनी फाऊल पक्ष्याला आपण मांस देखील खाऊ घालू शकतो. मांसचे तुकडे अगदी बारीक करावे लागतील जेणे करुन गिनी पक्ष्यांना खाण्यास आणि गिळण्यास सहज सोपं जाईल.गिनी पक्षी गोमांस देखील खाते, यामुळे गिनी पक्षी सर्व प्रकारचे अन्न खाण्यास सक्षम आहे.
Bread ब्रेड
आपण बर्याच अमेरिकन कुटुंबांना विचारल्यास, ते तुम्हाला सांगतील की शिळे ब्रेड किंवा भाकरी नियमितपणे फेकून देतात. ब्रेडमध्ये सर्वोत्कृष्ट शेल्फ लाइफ नसते आणि ते बर्याचदा लवकर होते, विशेषत: जर आपण ते सोडले किंवा दमट अशा ठिकाणी राहता. ते फेकण्याऐवजी पक्ष्यांना द्या. गिनी फाऊल पक्ष्याला भाकरी आवडतात, परंतु त्यांना जास्त भाकरी न देण्याची खबरदारी घ्या. हे ट्रीट म्हणून ठेवा कारण भाकरीकडे एक पौष्टिक मूल्य नसते.
7. Vegetables
भाजीपाल्यांमध्ये आपण गिनी पक्ष्याला भाजीपाल्यांचे उरलेले अवशेष देऊ शकतो. यासह आपण त्यांना गाजर आणि काकडी खाण्यास घालू शकतो.
8. Cereals तृणधान्ये
गिनी पक्ष्याला आपण बार्ली, ज्वारी, बाजरी, आदी तृणधान्य आहारात देऊ शकतो.
9. Fruits
होय, आम्ही आधीपासूनच टरबूजचा उल्लेख केला आहे, परंतु गिनिया पक्षी इतर प्रकारची फळे खाईल. आपण बेरी, सफरचंद, संत्री आणि इतर फळांचा वापर दर काही वेळाने प्रत्येक वेळी त्यांना देऊ शकतात.
Published on: 21 July 2021, 07:25 IST