Animal Husbandry

शेतीला जोडधंधा म्हणून पशूपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. त्यामूळे शेतकऱ्यांना दूध व्यवसायातून चांगला नफा मिळतो. पण जनावरांचे आरोग्य चांगले असेल तर त्यांच्यापासून चांगल्या प्रतीचे दूध उत्पादन मिळते. म्हणून जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे असते. हिवाळ्यात जनावरांना लाळ्या खुरकूत आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळत आहे. हा संसर्गजन्य रोग असून प्रामुख्याने डिसेंबर पासून ते जून महिन्यापर्यंत होण्याचे प्रमाण जास्त असते.

Updated on 06 November, 2023 6:02 PM IST

शेतीला जोडधंधा म्हणून पशूपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. त्यामूळे शेतकऱ्यांना दूध व्यवसायातून चांगला नफा मिळतो. पण जनावरांचे आरोग्य चांगले असेल तर त्यांच्यापासून चांगल्या प्रतीचे दूध उत्पादन मिळते. म्हणून जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे असते. हिवाळ्यात जनावरांना लाळ्या खुरकूत आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळत आहे. हा संसर्गजन्य रोग असून प्रामुख्याने डिसेंबर पासून ते जून महिन्यापर्यंत होण्याचे प्रमाण जास्त असते. ज्या जनावरांची खूर विभागलेली असते अशा जनावरांना हा आजार जास्त होतो.या रोगाचा प्रसार लाळेतून होत असतो.

रोगाची लक्षणे -
या रोगाची लागण झाल्यास जनावरे खाणे-पिणे कमी होते. जनावरांना ताप येतो, शरीरात उच्च तापमान तसेच तोंड,सड,खुराच्या मधून स्त्राव येत राहतो.दूध उत्पादनात घट होते. दूध उत्पादनक्षमता कायमची नष्ट होण्याचे प्रमाण वाढते. जनावराच्या जिभेवर, टाळूवर व तोंडाच्या आतील भागात फोड येतात.शरीरात थकवा जाणवतो अशक्तपणा येतो. जनावरांना खुरांतील मोकळ्या भागामध्ये फोड येतात. या रोगाची लागण झालेले जनावर पाय सारखे झटकत असते.

उपाय -
रोगी जनावरांनी खाल्लेला चारा इतर जनावरांना देऊ नये.
रोगट जनावरांना पाण्याची व्यवस्थाही वेगळ्या ठिकाणी करावी.
रोगट जनावरांना जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे.
रोगग्रस्त जनावरांचा गोठा रोज जंतुनाशकाने धुवावा.
माशा, कीटक यांच्यावर नियंत्रण ठेवावे.
जनावरांचे लसीकरण केल्यास या रोगाची लागन होत नाही.

English Summary: lalya khurkut symptoms and remedies
Published on: 06 November 2023, 06:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)