सध्या आपले महाराष्ट्र मध्ये जनावरांना लाळ्या खुरकूत आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळत आहे. मागील काही दिवसांमध्ये या आजाराने अक्षरश थैमान घातले. हा आजार प्रामुख्याने डिसेंबर पासून ते जून महिन्यापर्यंत होण्याचे प्रमाण जास्त असते. ज्या जनावरांची खूरजास्त विभागलेली असते अशा जनावरांनाहाआजार जास्त होतो. या लेखात आपण या आजाराची लक्षणे आणि करावयाची प्रतिबंधात्मक उपाय याबद्दल माहिती घेऊ.
लाळ्या खुरकूत आजाराची लक्षणे
- लाळ्या खुरकूत आजार झालेल्या जनावरांचे खाणे पिणे बंद होते. जनावरांना जास्तीचा ताप येतो. जनावरे चा दुसरा असतील तर त्यांच्या दूध उत्पादनात घट येते. एखाद्या वेळी दूध उत्पादन क्षमता कायमची नष्ट होऊ शकते.
- लाळ्या खुरकूत आजारांमध्ये जनावराच्या टाळूवर, तोंडाच्या आतील भागावर तसेच जिभेवर फोड येतात. जनावरांच्या तोंडातून चिकट तारे सारखी लाळ गळते.तसेच पुढील पायांच्या खुरांच्या मधील भागावर फोड येतात. असे पोटभर जनावरांच्या मागील पायांमध्ये आले तर अपंगत्व येते.
- पायाने अपंग असलेले पीडित जनावर रोगाने प्रादुर्भावग्रस्त पाय सारखे झटकत असते.
लाळ्या खुरकूत आजारावर प्रतिबंधात्मक उपाय
- या रोगाची साथ चालू असताना जनावरे चरण्यासाठी बाहेर जाऊ देऊ नयेत. कळपात एखाद्या जनावराला हा आजार झाला असेल तर त्याचा चारा इतर निरोगी जनावरांना खाऊ देऊ नये कारण लाळ्या खुरकूत आजाराचा प्रसार हा जनावरांच्या लाळे मार्फत होतो.
- लाळ्या खुरकूत झालेली जनावरे ही निरोगी जनावरांपासून वेगळे करावेत.
- रोजी जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता वेगळ्या ठिकाणी पाणी पाजावे.
- ज्या ठिकाणी या आजाराने प्रादुर्भाव झालेली जनावरे बांधलेली असतात ती जागा दिवसातून किमान एकदा जंतुनाशकाने स्वच्छ धुवावी.
- जनावरांचे दूध काढण्याचे भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावीत. भांड्यांचे निर्जंतुकीकरण होईल व रोगप्रसार टळेल.
- जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्यता होत नाही.
- लाळ्या खुरकूत आजाराचे नियंत्रणासाठी लसीकरण हे सप्टेंबर आणि मार्चमध्ये करावे.
Published on: 27 September 2021, 02:28 IST