भारत हा पशूपालन व्यवसाय अत्यंत जलदगतीने विकास करणारा देश आहे. पशु उत्पादनात आपला देश थोड्या कालावधीतच भारत स्वयंपूर्ण होईल.जगामध्ये भारताचा दूध उत्पादनात प्रथमक्रमांक लागतो.तसे पाहायला गेले तर भारतातील पशुपालन व्यवसायात पुष्कळ अडचणींना सामोरे जावे लागते
त्यातील महत्त्वाच्या अडचणीदूध उत्पादन व गुणवत्ता या आहेत.या समस्यांमध्ये सर्वात मोठी समस्या आहे जनावरांच्या आरोग्याची.जनावरांचे आरोग्य चांगले असेल तर त्यांच्यापासून आपणालाउच्च प्रतीचे दूध उत्पादन मिळते.म्हणून जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे.या लेखात आपणजनावरांना होणाऱ्या लाळ्या खुरकूतहा आजार, त्याची लक्षणे आणि उपाय जाणून घेणार आहोत.
जनावरांमधील लाळ्या खुरकूत रोग
लाळ्या खुरकूत रोग अत्यंत संसर्गजन्य रोग असून दुभंगलेल्या खुरामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो.शरीरात उच्च तापमान तसेच तोंड,सड,खुराच्या मधून स्त्राव येत राहतो.रोगातून व्यवस्थित रित्या बाहेर पडलेल्या जनावरांच्या पायाच्या खुरा खरबरीत व उध्वस्त झाल्या सारख्या दिसतात.भारतामध्ये हा रोग मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून त्याचे उपचार व व्यवस्थापन करणे,हे पशुधन व्यवस्थापनातील मोठे जोखमीचे काम झाले आहे.या रोगाचा प्रसार प्रत्यक्ष संपर्क द्वारे किंवा पाणी, शेणआणि चारा इत्यादींच्या माध्यमातून अप्रत्यक्ष होतो.त्याचप्रमाणे जनावरांचे संगोपन करणारी व्यक्ती याद्वारेही प्रसार होतो.शेतातील उंदीर,जनावरे, पक्षी इत्यादींच्या माध्यमातून प्रसार होतो.
लाळ्या खुरकूत आजाराचे लक्षणे
1-या आजारामध्ये जनावरांना उच्च ताप येतो.
2-तोंडाद्वारे तंतुमय लाळ सतत येत राहते.
3-तोंडावर व आतमध्ये पारदर्शक तंतुमय स्त्रावदिसू लागतो.
4-शरीरात थकवा जाणवतो अशक्तपणा येतो.
5- संकरित गाई या रोगास अत्यंत संवेदनशील आहेत.
या रोगावर उपचार
- जखमेच्या बाहेरील भागावर अँटीसेप्टीक लावल्यास जखम भरून येण्यास मदत होते व माशापासून प्रतिबंध होतो.
- सामान्य व स्वस्त उपाय म्हणजे जखम स्वच्छ करून घेऊन त्यावरती कोल टार व कॉपर सल्फेट चे 5:1 हे द्रावण लावणे.
सावधगिरी
- जास्त दूध देणाऱ्या दुभत्या गाई व विलायतेतील प्रजाती यांची संरक्षक उपाय नियमित करण्यात यावे.
- दोन प्रतिबंधक लसीकरण सहा महिन्याच्या अंतराने करण्यात यावे.त्यानंतर प्रत्येक वर्षी एक लसीकरण करणे आवश्यक आहे.
- रोगाची लागण झालेली जनावरे कळपातून वेगळे करून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपल्या जवळील पशुवैद्यकीय डॉक्टरांना तात्काळ बोलवावे.
- ब्लिचिंग पावडर किंवा जंतुनाशक कार्बनिक आम्ल द्वारे जनावरांच्या गोठ्याचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
- रोगाची लागण झालेल्या जनावरांची काळजी घेणारी व्यक्ती,वापरण्यात येणारी उपकरणे ही वेगळी असावी.त्यांचा हात निरोगी जनावराशीसंपर्क येऊ देऊ नये याची दक्षता घ्यावी.
- उपकरणे योग्यरीत्या स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
- अतिरिक्त पशुखाद्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी.
- मृत जनावरांची विल्हेवाट योग्य प्रकारे लावण्यात यावी.
- माशा, कीटक यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात यावे.
Published on: 25 November 2021, 12:26 IST