Animal Husbandry

जनावरांचे उत्तम आरोग्य तसेच त्यांचे वजन आणि दूध उत्पादनसाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे जनावरांचा आहार. जनावरांच्या रोजच्या आहारामध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, क्षार, जीवनसत्त्व यांचे प्रमाण असते. कर्बोदके मधील जनावरांना जलद पोचणार तसेच ऊर्जा देणारा पदार्थ म्हणजे फायबर. तंतुमय पदार्थांमध्ये सेल्युलोज, हेमीसेल्युलोज, लिग्नीन एवढे प्रमाण असते.

Updated on 22 November, 2021 1:34 PM IST

जनावरांचे उत्तम आरोग्य तसेच त्यांचे वजन आणि दूध उत्पादनसाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे जनावरांचा आहार. जनावरांच्या रोजच्या आहारामध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, क्षार, जीवनसत्त्व यांचे प्रमाण असते. कर्बोदके मधील जनावरांना जलद पोचणार तसेच ऊर्जा देणारा पदार्थ म्हणजे फायबर. तंतुमय पदार्थांमध्ये  सेल्युलोज,  हेमीसेल्युलोज, लिग्नीन  एवढे  प्रमाण असते.

तंतुमय पदार्थांचा पुरवठा:-

शेतातील दुय्यम पदार्थ म्हणजेच हिरवा चारा, वाळलेला चारा, चुन्नी, भुसा, धान्याचा कोंडा, टरफले यांचा समावेश असतो. तंतुमय पदार्थांमध्ये एक परिणामकारक तंतुमय पदार्थ असतो.तंतुमय पदार्थामधील हेमिसेल्युलोज आणि सेल्युलोज चे पचन होऊ शकते मात्र लिग्नीनचे पचन होत नाही. निबार चार, स्थितीच्या पुढे गेलेला चारा तसेच शेतामध्ये जास्त वाळणारा चार मध्ये लिग्निनचे प्रमाण जास्त असल्याने त्याची पचनशक्ती कमी होते. उत्तम चाऱ्याची कापणी योग्य केल्याने त्यामध्ये तंतुमय पदार्थ आढळतो.

जनावरांच्या आहारातील तंतुमय पदार्थाचे फायदे:-

१. जनावरांच्या पोटाची, आतड्याची योग्य हालचाल होते.
२. यामुळे जनावरांचे पोट गच्च होत नाही तसेच पोटफुगी पण होत नाही.
३. तंतुमय पदार्थ पोटातील पाणी शोषून घेतात त्यामुळे जनावरांचे पोट फुगते आणि त्यांना पोट भरल्याचे समाधान मिळते.
४. जनावरे जास्त पाणी पितात तसेच त्यांच्या दुधाची फॅट वाढते.
५. स्वयंक्रिया उत्तम राहते तसेच पोट साफ होण्यास मदत होते.
६. जनावरांच्या रक्तामधील साखरेचे प्रमाण तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.

तंतुमय पदार्थांची उपयोगिता वाढविण्यासाठी उपाययोजना:-

चाऱ्याची कुटी १ ते २ इंच आकाराची करावी. तुम्ही जर लहान तुकडे केले तर तंतूमय घटकांची उपयुक्तता कमी होते.
जनावरांच्या आहारात लांब धाट असलेला चारा योग्य स्थितीत वाळवून द्यावा.
शेतातील दुय्यम पदार्थावर, युरिया, मळी/ गूळ, क्षारमिश्रण, वाफ, सोडियम हायड्रॉक्साईड, अमोनियम हायड्रॉक्साईडची योग्य प्रमाणात प्रक्रिया करावी.
जनावरांच्या दैनंदिन आहारामध्ये वाळलेला चाऱ्याचा योग्य प्रमाणात ‘टोटल मिक्स राशन' पदधतीने वापर करावा.

१. चाऱ्याची कुटी जास्त बारीक करू नये तसेच त्याचा आकार १ ते २ इंच असावा. जर जास्त चाऱ्याचे तुकडे केले तर त्यामधील उपयुक्तता कमी होते.
२. जनावरांच्या आहारात जो लांब धाट चारा आहे तो चांगला वाळवून घ्यावा.
३. शेतातील जे दुय्यम पदार्थ आहेत त्या पदार्थांवर युरिया, मळी/ गूळ, क्षारमिश्रण, वाफ, सोडियम हायड्रॉक्साईड, अमोनियम हायड्रॉक्साईडची ची प्रक्रिया करावी.
४. रोजच्या आहारामध्ये जो वाळलेला चारा आहे त्यामध्ये योग्य प्रमाणात टोटल मिक्स राशन प्रक्रिया करावे.
५. पशुखाद्य तसेच वाळलेला चाऱ्याचे ब्लॉक्स तयार करावे.
६. जनावरांना पाणी पिण्यासाठी मूलबक पाणी उपलब्ध करून दयावे.
७. जनावरांच्या चाऱ्याची कापणी योग्य प्रमाणात करावी.

English Summary: Know the importance of fibrous matter in animal diet
Published on: 22 November 2021, 01:25 IST