Animal Husbandry

बहुतांश शेतकरी शेती बरोबर शेळीपालन किंवा मेंढी पालन व्यवसाय करत असतात. महाराष्ट्र राज्यातील 50 टक्के शेतकरी हे मेंढपाळ आहेत. दरवर्षी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी मेंढ्या चरण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असतात.शेळी आणि मेंढी यांमध्ये खूप फरक आहे. शेळी च्या तुलनेने मेंढी पालन हे जास्त फायदेशीर ठरते आहे. कारण शेळ्यांच्या पिल्लांना कमीत कमी 5 महिने सांभाळावे लागते परंतु मेंढ्याची पिल्ले 3 महिन्यात मोठी होतात.मेंढ्या या प्रत्येकाने पहिल्या आहेत परंतु महाराष्ट्र राज्यात आढळणाऱ्या मेंढ्यांच्या जाती तुम्हाला महितेयत का? तर चला आपण आज या लेखातून मेंढ्यांच्या जाती विषयी माहिती घेऊ.

Updated on 07 November, 2021 11:25 PM IST

बहुतांश शेतकरी शेती बरोबर शेळीपालन किंवा मेंढी पालन व्यवसाय करत असतात. महाराष्ट्र राज्यातील 50 टक्के शेतकरी हे मेंढपाळ आहेत. दरवर्षी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी  मेंढ्या चरण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असतात.शेळी आणि  मेंढी यांमध्ये खूप फरक आहे. शेळीच्या तुलनेने मेंढी पालन हे जास्त  फायदेशीर ठरते आहे. कारण  शेळ्यांच्या पिल्लांना कमीत कमी 5 महिने सांभाळावे लागते परंतु मेंढ्याची पिल्ले 3 महिन्यात मोठी होतात.मेंढ्या या प्रत्येकाने पहिल्या आहेत परंतु महाराष्ट्र राज्यात आढळणाऱ्या मेंढ्यांच्या जाती तुम्हाला महितेयत का? तर चला आपण आज या लेखातून मेंढ्यांच्या जाती विषयी माहिती घेऊ.

1) डेक्कनी मेंढी:-

आपल्या भागात सर्वात जास्त आढणाऱ्या मेंढ्यांच्या जातीमध्ये ही जात आढळते. या मेंढ्यांचा रंग प्रामुख्याने काळा आणि पांढरा  असा  मिश्र स्वरूपाचा असतो. कळपामध्ये  या  मेंढ्याच्या पिल्लांची पैदास ही ७५.२ % टक्के एवढी आहे.या मेंढीचा वापर हा प्रजननासाठी आणि कत्तलीसाठी केला जातो. आणि यातून उत्पन्न  मिळवले जाते. तसेच लोकर  उत्पादन करून सुद्धा उत्पन्न मिळवले जाते. एक मेंढी वर्षाला 588 ग्रॅम लोकर देते.

2)माडग्याळ मेंढी:-

या जातीच्या मेंढ्यांचा रंग हा पांढरा आणि तपकिरी असतो किंवा अंगावर तांबड्या रंगाचे ठिपके असतात. या जातीच्या मेंढ्याना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. या मेंढीच्या जातीचे आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या मेंढीचे नाक हे बर्हिवक्र असते. तसेच या जातीची मेंढी प्रति वर्षाला 250 ते 260 ग्रॅम लोकर देते.तसेच या मेंढ्या ची दूध क्षमता ही खूपच कमी असते फक्त एका पिल्लाला पुरेल एवढेच दूध या मेंढ्या देतात. या मेंढ्याचा वापर हा प्रजनन करण्यासाठी केला जातो तसेच इतर जातींच्या तुलनेत या जातीच्या मेंढ्यांना बाजारात मागणी सुद्धा जास्त आहे आणि किंमत सुद्धा जास्त आहे. या मेंढ्यांचे अन्न हे झाडपाला आणि गवत हे आहे.

या बरोबरच महाराष्ट्र राज्यामध्ये संगमनेरी, लोणंद, सोलापुरी, कोल्हापुरी या दख्खनी मेंढींच्या चार उपजाती सुद्धा प्रचलित आहेत. तसेच विदेशातील जातीमध्ये मेरिनो, रॅमब्युलेट, चेव्हिओट, कॉरिडेल, डॉरसेट, साऊथ-डाऊन, पोलवर्थ, सफॉल्क या प्रजातीच्या मेंढ्या पाळल्या जातात.

आवश्यक खुराक:-

चाऱ्या व्यतिरिक्त मेंढ्याना खुराक देणे खूप महत्वाचे आहे यामध्ये पेंड, भरडा, गहू, ज्वारी, मका यांचा सुद्धा समावेश करावा. यामुळं मेंढ्याची दूध उत्पादन क्षमता वाढते आणि मेंढ्याचा वजनात सुद्धा झपाट्याने वाढ होते.

English Summary: Know, different breeds of sheep in the state of Maharashtra
Published on: 07 November 2021, 11:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)