Animal Husbandry

आपल्या देशातील बहुसंख्य लोक हे शेती व्यवसाय करतात. शेती व्यवसाय सह जोड व्यवसाय म्हणून पशुपालन हा व्यवसाय करतात. पशुपालनात कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे म्हणजे शेळी आणि मेंढी पालन. आज आम्ही आपणास मेंढी पालन विषयी माहिती देणार आहे.

Updated on 25 August, 2021 1:07 PM IST

 आपल्या देशातील बहुसंख्य लोक हे शेती व्यवसाय करतात. शेती व्यवसाय सह जोड व्यवसाय म्हणून पशुपालन हा व्यवसाय करतात. पशुपालनात कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे म्हणजे शेळी आणि मेंढी पालन. आज आम्ही आपणास मेंढी पालन विषयी माहिती देणार आहे.

 शेळी पालन करणारे काही प्रमाणात आपल्या कळपात मेंढी ही पाळत असतात. धनगर समाज तर पूर्णपणे मेंढी पालन करत असतो. त्यांचा उदरनिर्वाह हा मेंढीपालन वरच असतो. जर आपल्याला पशुपालनाचे आवड असेल तर आपण मेंढी पालन करावे मेंढी पालन बक्कळ कमाई आहे. भेंडीच्या काही जाती आहेत त्यांची कमाई अधिक असते.

.या मेंढ्यामांस,लोकर आणि दुधाचा व्यवसाय साठी फार उपयुक्त आहेत.  महाराष्ट्रामध्ये डेक्कनी, माडग्याळ या जातीच्या मेंढ्या आढळतात. डेक्कनी मेंढी मांस उत्पादनासाठी चांगले असतात. सहा महिन्यानंतर मांसचा उतारा हा 49.6×18 टक्के तर मेंढ्या पासून 587 ग्रॅम लोकर मिळते.माडग्याळ मेंढी चा रंग प्रामुख्याने पांढरा व त्यावर तपकिरी मोठे ठिपके आढळतात. तसेच ही माडग्याळ मेंढ्यांचे खास वैशिष्ट्ये आहे की या जातीच्या मेंढ्यांच्या नर आणि मादी यांना शिंग येत नाही.या जातीच्या मेंढ्या पासून लोकर आणि दूध दही कमी मिळत असते.याव्यतिरिक्त देशात आढळणारे इतर मेंढ्यांच्या जाती विषयी आपण जाणून घेणार आहोत

-गद्दीमेंढी:

 या मेंढ्या मध्यम आकाराचे असतात. त्यांचा रंग पांढरा,लालआणि हलका काळा असतो.या मेंढ्यापासून वर्षातून तीनदा आपल्याला लोकर मिळत असते. साधारण एक ते दीड किलो वजनाची लोकर आपल्याला मिळते.या जातीच्या मेंढ्या हिमाचल प्रदेशाच्या रामनगर,उधमपुर,कुल्लू,जम्मू-काश्मीर आणि कांगडा खोऱ्याततसेच उत्तराखंडच्या नैनिताल तेहरी, गडवाल,चिमोली जिल्ह्यात आढळतात. या मेंढ्या  मधील नरांना शिंग असतात. याशिवाय 10 ते 15 टक्के मादी मेंढ्यांना पण शिंग असतात.

2- मुजफ्फर नगरी:

या जातीच्या मेंढ्या दिल्ली,हरियाणा,उत्तर प्रदेशाच्या मुजफ्फरनगर,बुलंद शहर,सहारनपुर,मेरट, बिजनोर येथे आढळतात. या मेंढ्यांचा रंग पांढरा असतो. यांच्या शरीरावर भुरक्या रंगाचे आणि काळ्या रंगाचे ठिपके असतात.

3-जालौनी:

 या जातीच्या मेंढ्या उत्तर प्रदेशाच्या जालौन, झांसी आणि ललितपुर मध्येआढळतात.यांचा आकार मध्यम असतो. या जातीच्या मेंढ्यांना नर आणि मादी यांना शिंग असतात. याचे कान्हे आकाराने मोठे आणि लांब असतात. या मेंढ्यांचा लोकरी मऊ आणि जाड असतात.लोकर छोट्या असतात आणि मोकळे असतात.

4-पुंछी:

या जातीच्या मेंढ्या या मूळ जम्मू प्रांतातील पुंच आणि राजौरी  भागात आढळतात. या मेंढ्या गद्दी जाती सारख्या असतात.परंतु यांचा आकार छोटा असतो तर रंग पांढरा असतो व शेपटी लहान असते.

5-

करणाह:

 या जाती उत्तरी काश्मीरच्या डोंगराळ भागातील करणाह येथे आढळतात.यांचा आकार मोठा असतो. या मेंढ्या तील नराचे  शिंगे असतात. या मेंढ्यांचा रंग पांढरा असतो.

6- मारवाडी:

या जातीच्या मेंढ्या राजस्थानच्या जोधपूर,नागौर,जालौर, पाली या परिसरात आढळतात.यांचा आकार लहान असतो. परंतु यांच्यापासून मिळणारी लोकर  ही पांढऱ्या रंगाची असते. लोकर खूप दाट असल्याने वजनदार असते.

English Summary: know about species of sheep help to farmer for financial progress
Published on: 25 August 2021, 01:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)